स्वीट डिलीशीयस सीताफळ बासुंदी सीताफळ रबडी दसरा दिवाळीकरिता
आता सीताफळचा सीझन चालू आहे. आपल्याला बाजारात बऱ्याच प्रमाणात सीताफळ उपलब्ध होतात. सीताफळ आप नुसते खाऊ शकतो किंवा त्याची बासुंदी किंवा रबडी किंवा आइसक्रीम सुद्धा बनवू शकतो. सीताफळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे.
The Maharashtrian Delicious Sitafal Basundi Sitafal Rabdi can of be seen on our YouTube Channel of Sitafal Basundi Sitafal Rabdi For Dasara Diwali
सीताफळ बासुंदी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच खूप स्वादिष्ट लागते. आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. विडियो मध्ये सीताफळ झटपट अगदी दोन मिनिटांत कसे सोलायचे म्हणजे त्याच्या बिया काढून पल्प कसा काढायचा ते सुद्धा पहाणार आहोत. सीताफळ सोलणे म्हणजे महाभयंकर काम असते. पण त्याचा पल्प काढून त्याचे पदार्थ पण छान स्वादिष्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: २०-२५ मिनिट
वाढणी: ४ जणसाठी
साहीत्य:
१ मोठ्या आकाराचे सीताफळ किंवा २ मध्यम आकाराची सीताफळ
१/२ लिटर दूध (फूल क्रीम)
१/२ वाटी साखर
१/२ टी स्पून वेलची पावडर
२ टे स्पून काजू बदाम (तुकडे)
१/२ वाटी कंडेनस मिल्क (आवडत असेलतर)
७-८ केसर काड्या
१ टी स्पून तूप
कृती: प्रथम आपण सिताफळच्या बिया काढून गर बाजूला काढून घ्या. बिया काढून गार काढण्याची सोपी ट्रिक आहे. आपल्याकडे पुराण यंत्र असतेच तर पुराण यंत्राची मोठ्या लांबट भोकाची चकती लाऊन त्यामध्ये सीताफळचा चमच्यानी गर काढून पुरणतंत्र मध्ये ठेवा मग पुराण आपण जसे फिरवून काढतो तसे करून गर खाली ठेवलेल्या भाड्यात काढा मग बिया हातांनी बाजूला काढून घ्या. किंवा आपल्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण अगदी झटपट बिया काढू शकतो.
दूध विस्तवावर गरम करून आटवायला ठेवा. साधारणपणे १० मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. मग त्यामध्ये साखर व केसर घालून मिक्स करून परत मंद विस्तवावर ५ मिनिट गरम करून विस्तव बंद करून त्यामध्ये जायफळ, वेलची पावडर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.
दूध थंड झाल्यावर त्यामध्ये सीताफळचा गर घालून मिक्स करून घ्या.
ड्राय फ्रूटचे तुकडे करून एक चमचा तुपात परतून सीताफळ बासुंदीवर त्यांनी सजावट करून घ्या.
थंड करून सीताफळ बासुंदी आता आपण सर्व्ह करू शकतो.
जर आपल्याला सीताफळ रबडी बनवायची असेलतर दूध अजून जास्त आटवून घ्यावे.