न्यूट्रिशियस अगदी निराळा जबरदस्त नाश्ता मुलांसाठी रेसीपी
आपल्याला रोज नाश्तासाठी काय बनवायचे हा प्रश्न असतो. तसेच मुले भाजी खायचा कंटाळा करतात. व त्यांना नेहमी नवीन नवीन पदार्थ खायचे असतात व ते सुद्धा छान चटक मटक हवे असतात.
आता सध्या महामारी मुळे प्रतेक जण त्रस्त झाला आहे आई वडील दोघे घरी बसून काम करीत आहेत. तसेच मुलांची शाळा सुद्धा बंद असून घरूनच ऑनलाईन स्टडी अभ्यास चालू आहे. मुले घरी असल्यामुळे त्यांना सारखे काहीना काही खायला पाहिजे.
The Nutritious Different Nashta For Kids can of be seen on our YouTube Channel of Nutritious Different Breakfast For Kids
आपण अश्या प्रकारचा हेल्द्धी म्हणजेच न्यूट्रिशियस नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तसेच झटपट कमी श्रमात बनवू शकतो. अश्या प्रकारचा नाश्ता बनवताना गाजर, शिमला मिरची, बटाटा, टोमॅट व रवा वापरला आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप बारीक रवा
1 छोटे गाजर (चिरून)
1 शिमला मिरची (चिरून)
1 लाल मिरची (चिरून)
¾ टी स्पून किंवा मीठ चवीने
2 टे स्पून दही
½ कप पाणी
¼ टी स्पून बेकिंग सोडा
सारणासाठी:
1 टे स्पून तेल
½ टी स्पून जिरे
1 कांदा (उभा पातळ चिरून)
2 मध्यम बटाटे (उकडून, कुस्करून)
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून मिरे पावडर
1 छोटा टोमॅटो (चिरून बिया काढून)
मीठ चवीने
2 टे स्पून टोमॅटो केचप
2 टे स्पून तेल
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून व कुस्करून घ्या. गाजर, शिमला मिरच बारीक चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.
एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये चिरलेले गाजर, शिमला मिरची, लाल मिरची, दही, मीठ व पाणी घालून मिक्स करून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून उभा पातळ चिरलेला कांदा घालून थोडासा परतून घ्या. मग त्यामध्ये हळद घालून कुस्करलला बटाटा घालून मिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून थोडे कोथिंबीर घालून परत मिक्स करून एक चांगली वाफ येऊ द्या.
आता भिजवलेला रवा घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा घालून मिक्स करून थोडे लागेल तसे पाणी घालून सैलसर मिश्रण बनवून घ्या. आता आपल्याला आपण तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणाला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी एक मोट्या आकाराचे भांडे घेऊन त्यामध्ये पाणी घालून एक स्टँड ठेवा. पाणी गरम होउ द्या. एका स्टीलच्या प्लेटला तेल लाऊन त्यामध्ये रव्याचे मिश्रण घालून ती प्लेट गरम केलेल्या पाण्याच्या भांड्यात ठेवा वरतून दुसरी प्लेट ठेवा व 10-12 मिनिट वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून प्लेट खाली उतरवून घ्या. थंड झाल्यावर बाहेर काढून त्याचे एक सारखे चौकोनी तुकडे करून घ्या. मग एक तुकडा घेऊन परत मध्ये चिरून घ्या. आपण ब्रेड सँडविच कसे बनवतो तसे आपल्याला करायचे आहे. दोन्ही भागाला टोमॅटो केचप लावून त्यामध्ये बटाटाचे बनवलेले सारण भरून सँडविच सारखे बनवून घ्या. अश्या प्रकारे सर्व सँडविच बनवून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तेल लावून सर्व सँडविच ठेवा बाजूनी थोडे तेल सोडुन दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.