2 प्रकारचे रस मलई स्टफ मोदक व इन्स्टंट रस मलई मोदक पनीर मोदक गणपती बाप्पासाठी
आता गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश उत्सव 10 सप्टेंबर 2021 शुक्रवार पासून चालू होत आह. मोदक ह गणपती बाप्पाना खूप प्रिय आहेत. ह अगोदर आपण बऱ्याच प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पहिले. आता आपण अजून एक नवीन प्रकार पहाणार आहोत तो म्हणजे रसमलई मोदक. आपणा सर्वाना माहीत आहेच की रसमलई पण त्याचे मोदक हा एक नवीन प्रकार आहे खूप स्वादिष्ट लागतो.
The Ganesh Utsav 2021 Modak can of be seen on our YouTube Channel of Modak Rasmalai Stuffed Modak & Instant Rasmalai Modak Paneer Modak For Ganesh Chaturthi Bhog
पहिल्या प्रकारात आपण रसमलई स्टफ करून मोदक बनवणार आहोत. हा प्रकार खूप छान लागतो.
दूसरा प्रकार इन्स्टंट रसमलई मोदक. हा प्रकार सुद्धा खूप छान लागतो. तसेच दिसायला खूप आकर्षक दिसतो. ह्यालाच आपण पनीर मोदक सुद्धा म्हणू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 रसमलई स्टफ मोदक
वाढणी: 18 इन्स्टंट रसमलई मोदक
रस मलई स्टफ मोदक
साहीत्य:
रस मलई (बाजारची) किंवा घरी बनवलेली
अंगुरी रसमलई कशी बनवायची ती लिंक पहा
½ लिटर दूध
1 टे स्पून व्हाइट विनिगर
2-3 थेंब लाल रंग
1 टे स्पून पिठीसाखर
½ टी स्पून वेलची पावडर
इन्स्टंट रस मलई मोदक
साहीत्य:
½ लिटर दूध किंवा 1 कप पनीर
1 कप मिल्क पावडर
2 टे स्पून पिठीसाखर
3-4 थेंब रसमलई एसेन्स
1 टी स्पून तूप
4-5 पिस्ता (उभे लांबट चिरून)
गुलाबाच्या पाकळ्या
कृती: रसमलई मोदक बनवण्यासाठी पनीर म्हणजेच छाना घरी बनवू शकतो किंवा बाजारातून पनीर सुद्धा आणू शकतो. तसेच घरी पनीर रसमलई बनवण्याच्या एवजी आपण बाजारातून सुद्धा रसमलई आणून वापरू शकतो.
पनीर कसे बनवायचे येथे पाहू शकता.
रसमलई कशी बनवायची येथे पाहू शकता.
पनीर बनवण्यासाठी: ½ लिटर दूध गरम करून त्यामध्ये 1 टे स्पून विनिगर घालून मिक्स करून थोडेसे गरम करून विस्तव बंद करा. आता दुधातील पाणी व पनीर वेगवेगळे होईल. एक चाळणी व त्याच्या खाली त्याच्या आकाराचे भांडे ठेवून चाळणीवर एक मोठा रुमाल घालून त्यावर दुधाचे मिश्रण ओता पाणी निघून गेल्यावर त्यावर 2 मोठे ग्लास पाणी घालून रुमालची एक पुरचुंडी बांधा व लटकून ठेवा 2 तास. आता त्यातील पाणी पूर्ण निघून गेले असेल व पनीर चांगले कोरडे झाले असले. पनीर किसणीने किसून घ्या.
पहिला प्रकार रसमलई स्टफ मोदक:
पनीर किसून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर, लाल रंग व वेलची पावडर घालून मिक्स करा. मिश्रण चांगले मळून घ्या. मग त्याचे एक सारखे चार भाग करून घ्या. मोदक साचाला तूप लाऊन घ्या. मग त्यामध्ये एक भाग ठेवून त्यामध्ये एक अंगुरी रसमलई ठेवा व मोदक साचा वरतून मिश्रण लाऊन बंद करा. आता साचा मधून मोदक बाहेर काढा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
दूसरा प्रकार इन्स्टंट रसमलई मोदक:
पनीर किसून घ्या. एका नॉनस्टिक पॅन मध्ये किसलेले पनीर, मिल्क पावडर, पिठी साखर घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त गरम करून घ्या, मग मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये रसमलई एसेन्स घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे एक सारखे गोळे करून घ्या.
मोदक साचाला आतून तूप लाऊन घ्या. मग त्यामध्ये पिस्ताचे उभे चिरलेले तुकडे व गुलाब पाकळ्या ठेवून त्यावर एक गोळा ठेवा. मोल्ड बंद करून मिश्रण एक सारखे हळुवार पणे दाबून घ्या. मग मोल्ड मधून मोदक बाहेर काढून घ्या. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक झालेकी गणपती बाप्पाना भोग किंवा नेवेद्य दाखऊन खिरापत वाटा.