टोफू (सोया पनीर) म्हणजे काय टोफू सेवनाचे फायदे व तोटे
आपणा सर्वाना पनीर परिचयाचे आहे. पण टोफू म्हणजेच सोया पनीर हे खुप कमी लोकाना माहीत आहे. टोफू हे पौस्टीक आहे त्याच्या सेवनाचे बरेच फायदे आहेत. टोफू म्हणजे काय त्याच्या सेवनाचे फायदे व तोटे काय आहेत ते जाणून घेण्यासाठी शेवट पर्यन्त वाचा.
The Tofu (Soya Paneer) Benefits can of be seen on our YouTube Channel Tofu (Soya Paneer) Benefits
टोफू सोया मिल्क पासून बनवलेला एक खाद्य पदार्थ आहे. ते अगदी पनीर सारखे बनवतात. फक्त फरक इतकाच आहे की ते सोया मिल्क पासून बनवले जाते. टोफूमध्ये कैल्शियम, आयर्न व अजून बरेच तत्व आहेत.
टोफूचा स्वाद कसा आहे:
टोफू चवीला अगदी निराळे आहे. ते पनीर सारखे मुलायम नसते. तसे पाहिले तर त्याचा काही स्वाद नाही.त्याची चव आपण बनवलेल्या पदार्थावर अवलंबून आहे. त्याच्या साठी मसालाचा उपयोग केला तर त्याची चव चांगली लागते.
टोफू सेवनाचे आरोग्यदाई फायदे: Health Benefits of Tofu :
एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या साईटवर टोफू पनीर हे रोगांपासून बचाव करण्यासाठी किंवा रोग झाल्यावर टोफू सेवन करून काय फायदे हवू शकतात ते सांगितले आहे. पण काही गंभीर समस्या असतील तर डॉक्टरी सल्ला जरूर घ्या.
1. हृदयासाठी टोफू फायदेमंद:
हृदय रोगापासून बचाव करते टोफू. ज्या स्त्रिया व पुरुष आठोडयातून एकदा तरी टोफू सेवन करतात त्यांचा हृदय रोगापासून बचाव होतो. म्हणून आपल्या जेवणात टोफू शामील करा.
2. डायबिटीजसाठी टोफू फायदेमंद:
मधुमेह असणाऱ्यानी आपल्या आहारात टोफू शामील करावा कारणकी त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. सोया युक्त टोफू मध्ये कमी कार्बोहाइड्रेट आहेत. म्हणून त्याचे सेवन फायदेमंद आहे. पनीर हे थोडे गोड असते त्यामुळे रक्तातील साखर वाढते व सोया पनीर हे गोड नसते.
3. किडनीसाठी टोफू
सोया पनीरमधील प्रोटीन हे किडनीवर कमी दबाव येतो. त्यामुळे डायबीटीस झाल्यावर किडनीच्या समस्या कमी प्रमाणात होतात. तरी पण डॉक्टरचा सल्ला घेऊन आपल्या आहारात टोफू शमिल करावा. कारणकी प्रतेक व्यक्तीची प्रकृती निराळी असते.
4. मांसाहारचा चांगला विकल्प टोफू:
टोफूमध्ये प्रोटीन आहे. जे लोक नॉनवेज किंवा डेअरी प्रॉडक्ट सेवन करीत नाही त्यांनी आपल्या आहारात टोफू शामील करावा.
5. वजन कमी करण्यासाठी टोफू:
आपल्या रोजच्या जीवनशैली प्रमाणे शरीराचे वजन वाढते त्यासाठी टोफू आपल्या आहारात शामील करावा. कारण टोफू सेवन केल्याने भूक कमी लागते व शरीरातील अधिक फैट कमी होण्यास मदत होते.
6. लिवर के लिए टोफू:
टोफूचे सेवन केल्याने लिवरचे स्वास्थ ठीक राहते. टोफूमध्ये एंटीऑक्सीडेंट व हेपटोप्रोटेक्टिव गुण आहेत जे लिवर डॅमेज होण्यापासून बचाव करते.
7. हाडांसाठी फायदेमंद टोफू:
कैल्शियम असे पोषक तत्व आहे, जे हाडांसाठी लाभदायक आहे. आपल्याला माहीत आहे का आपले शरीर 99 टक्के कॅल्शियम स्टोर करू शकतो. त्याच्या मुळे हाडे व दात मजबूत राहतात. टोफूमध्ये कैल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी टोफू जरूर सेवन करावा
8. टोफूमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे:
बाकीच्या पोषक तत्वा बरोबर टोफू मध्ये प्रोटीन सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. लहान मुले, वयस्कर लोक, गर्भवती महिला हयाना प्रोटीन हे आवश्यक आहे. प्रोटीन मासपेशी, हाड, व शरीरातील ऊर्जा साठी महत्व पूर्ण आहे. म्हणून आपल्या आहारात टॉफी शामील करा.
9. कैंसर पासून बचाव करते टोफू:
टोफूचे सेवन केल्याने कॅन्सर पासून बचव होतो. ब्रेस्ट कॅन्सर अथवा ओव्हरीजचा कॅन्सर होण्या पासून बचाव होतो. त्याच बरोबर काही गंभीर रोगांपासून बचाव करते टोफू. पण ज्याना कॅन्सर आहे त्यांनी डॉक्टरचा इलाज केला पाहिजे.
10. त्वचासाठी टोफू:
टोफूचे सेवन त्वचा साठी लाभदायक आहे. सोयामध्ये असणारे आइसोफ्लेवोंस आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. सोया प्रॉडक्ट मुळे त्वचे वरील सुरकुत्याच्या समस्यामध्ये सुधार होतो.
11. केसांच्या आरोग्यासाठी टोफू:
टोफूचे सेवन केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. खर म्हणजे प्रोटीन आपल्या केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याने केस गळणे थांबते.
टोफू सेवनाचे तोटे अथवा नुकसान:
जर कोणाला सोया प्रॉडक्टची एलर्जी असेल तर त्यांनी टोफू सेवन करू नये नहीतर त्यांना पोट दुखी किंवा पोटा संबंधित विकार होउ शकतात.
टोफूचे सेवन जास्त वय असणाऱ्या लोकानी करू नये. त्यामुळे स्मरण शक्ति कमी होउ शकते.
टोफूचे अधिक सेवन केल्याने ब्लड क्लॉटिंग होउ शकते.
गर्भावस्थामध्ये टोफूचे जास्त सेवन करू नये नाहीतर अभ्रकावर वाईट परिणाम होउ शकतो.
पुरुषांनी टोफूचे जास्त सेवन करू नये नाहीतर त्याचा स्पर्मवर वाईट परिमाण होउ शकतो.