लक्ष्मी प्राप्ति साठी धनत्रयोदशी चे दिवशी चमत्कारी टोटके व मंत्र उपाय करा
धनत्रयोदस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. ह्या दिवसा पासून दिवाळीचे दिवे लावायची सुरवात होते. लक्षी प्राप्तीसाठी आपण बरेच उपाय किंवा टोटके करीत असतो. दिवाळी हा सण हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. दिवाळीचे सगळे दिवस शुभ मानले जातात. धनत्रयोदस ह्या दिवशी धातूची भांडी व सोने व चांदी खरेदी करण्याचे महत्व आहे. तसेच ह्या दिवशी धनाची पूजा करायची असते. त्याच बरोबर आपण काही उपाय करून आपली आर्थिक प्रगती सुद्धा करू शकतो.
The Dhantrayodashi Dhanteras 2021 Simple Totke And Mantra can of be seen on our YouTube Channel Dhantrayodashi Dhanteras 2021 Simple Totke And Mantra
धनत्रयोदशीच्या दिवशी ही सोपे टोटके करून पहा त्याने आपल्या जीवनात आर्थिक प्रगति होईल व आपले आर्थिक प्रश्न मिटण्यास मदत होईल. असे म्हणतात की ह्या दिवशी जे कोणते शुभ कार्य केले जाते त्याच्या 13 पट आपल्याला त्याचे फळ मिळते.
आपल्याला काही सोपे उपाय करायचे आहेत. सर्वात पहिल्यानदा आपल्याला 13 दिवे लावायचे आहेत मग भगवान कुबेर ह्याची तिजोरीमध्ये पूजा करायची आहे. पूजा केल्यावर आपल्याला ध्यान करून पुढील वाक्य म्हणायचे आहे.
गरुडामणीचे आभाळ असलेले, दोन्ही हातात गदा व वराह धारण केलेले, मस्तकावर उंच मुकुटाने सजवलेले सडपातळ शरीर असलेले, उंच विमानावर बसलेले, भगवान शिवांचे प्रिय मित्र निधेश्वर कुबेराचे मी ध्यान करतो.
त्यानंतर चंदन, धूप, दीप, पूजा करून नेवेद्य अर्पण करून पुढील मंत्र म्हणा-
‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धि मे देहि दापय दापय स्वाहा।’
त्यानंतर कपूर आरती करून मंत्र पुष्पांजलि अर्पित करा. असे केल्याने आपली धन संबंधित परेशानी दूर होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावा व त्याच्या जवळ 13 कौड्या ठेवा. मग मध्य रात्री त्या कौड्या घरातील एका कोपऱ्यात
पुरून ठेवा. असे केल्याने आपल्याला अचानक धन प्राप्ती होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 13 दिवे घरात व 13 दिवे घरा बाहेर लावून ठेवा असे केल्याने दरिद्रता, अंधकार, व घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरातील सदस्यासाठी काही उपहार घ्या. बाहेरच्या लोकांसाठी उपहार घेऊ नये.
जर आपल्यापाशी धन टिकत नसेलतर धनत्रयोदशीच्या दिवसा पासून लक्ष्मी पूजन पर्यन्त रोज 1 लवंग चा जोडा लक्ष्मी माताला अर्पण करा
धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण साखरेचा बतासा, खीर, तांदूळ, पांढरा कपडा, किंवा अजून काही पांढऱ्या वास्तु दान केल्यातर आपली जमा केलेली पुंजी वाढेल. व कोणत्यासुद्धा कार्यात बाधा येणार नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या सुद्धा किन्नरला दान देवून किन्नर कडून परत एक कॉईन मागून घ्या. किंवा तुम्ही सुद्धा परत एक कॉईन मागू शकता. मग ते कॉईन तिजोरीमध्ये किंवा पर्स मध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधी सुद्धा धन कमी पडणार नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी दारावर कोणीसुद्धा भिकारी, जमादार, किंवा गरीब व्यक्ति आले तर त्यांना काहीना काहीना द्या परत रित्या हातांनी त्यांना पाठवू नका. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. व ती आपल्याला आशीर्वाद देईन व आपले प्रेतक काम पार पडेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्यासुद्धा मंदिरमध्ये जाऊन त्यांना केळ्याचे झाड किंवा कोणते सुद्धा सुगंधित फुलांचे झाड तेथे लावा. जसजसे ते झाड मोठे होईल तसतशी आपली प्रगती होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी कोणा बद्दल सुद्धा वाईट बोलू नका. ह्या दिवशी कोणशी सुद्धा भांडण करू नका. त्यामुळे घरात सुख शांती व सकारात्मक ऊर्जा रहात नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुमच्या कडे शंख असेलतर त्यामध्ये पाणी घेऊन घरातील प्रतेक कोपऱ्यात त्याच्या तिल पाणी शिंपडा त्यामुळे माता लक्ष्मीचे आगमन होईल. त्याच बरोबर त्यातील पाणी पूजेमध्ये बसलेल्या लोकांवर शिंपडा घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल व त्यामुळे मन शुद्ध होईल.