डेंगु झाला प्लेटलेट कमी झाले ताप आला सोपे घरगुती रामबाण उपाय
डेंगु हा रोग डासा पासून पसरतो हे आपणा सर्वाना महित आहेच. हा एक प्रकारचा विषानुजन्य रोग आहे. असे 4 प्रकारचे विषाणू आहेत जे हा रोग होण्यास कारणीभूत आहेत. डेंगुचा संसर्ग झाल्यास शरीरातील प्रतिकार शक्ति खूप कमी होते. अचानक खूप ताप येतो, तीव्र डोकेदुखी होते, मळमळ, डोळ्याच्या वेदना, सांधेदुखी, थकवा येतो, शारीरिक वेदना होतात, भूक लागत नाही. त्वचेवर पुरळ येते,
डेंगु ह्या रोगावर अजून तरी कोणती सुद्धा लस निघाली नाही. पण डेंगु झालातर वेळीच डॉक्टरी सल्ला घेऊन औषध उपचार केले पाहिजेत नाहीतर खूप गंभीर परिस्थिति होउ शकते. त्यासाठी वेळीच उपचार करावे व कारण ह्यामध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट काऊंट खूप कमी होत जातो. साधारणपणे आपल्या रक्तातील प्लेटलेट काऊंट अडीच लाखाच्या पुढे असतो पण डेंगु झाल्यावर प्लेटलेट काऊंट कमी होत जातो कधी कधी 5 ते 10 हजार पर्यन्त जातो. ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे.
The Home Remedies For Dengue Fever And Increase in Platelet Count can of be seen on our YouTube Channel Home Remedies For Dengue Fever
डेंगु हा रोग झाल्यास वेळच औषध उपचार घ्या, विश्रांती घ्या., फळांचे रस सेवन करा, विश्रांती घ्या, घरामध्ये स्वछता ठेवा, घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी साठून देवू नका कारण की डेंगुचे मच्छर स्वच्छ पाण्यातच आढळून येतात. आपल्या फ्रीजच्या मागे एक ट्रे असतो त्यामध्ये फ्रीजमध्ये पाणी साचत असते तो ट्रे नेहमी स्वच्छ ठेवा, घरच्या बाल्कनीमध्ये झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये पाणी सचू देवू नका.
डेंगु झाला तर डॉक्टरी इलाज बरोबर घरगुती साधे सोपे उपचार म्हणजेच रामबाण उपाय सुद्धा करू शकता. त्यामुळे लवकर बरे होता येईल.
1. विटामिन सी: आपल्या आहारामद्धे विटामिन सी युक्त पदार्थ सेवन करा त्यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ति वाढते.
2 हळदीचा उपाय: आपल्या जेवणात हळद वापरा किंवा हळद वापरुन हळददूध घ्या. कारण की त्यामध्ये एंटीबायोटिक तत्व आहेत त्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते.
3. तुळस व मध: तुळस व मध चा प्रयोग डेगु होण्यापासून बचाव करू शकतो. तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यामध्ये मध घालून सेवन करावे. किंवा तुळस घालून काढा किंवा चहा सेवन करू शकता. कारण त्यामध्ये एंटी बैक्टीरियल गुणांमुळे डेगु होण्यापासून बचाव होतो.
4. पोपईची पाने: – डेंगूच्या इलाजसाठी पोपईची पान खूप फायदेमंद आहेत. पोपईच्यापानाचा रस काढून दिवसातून 2 वेळा 2-3 चमचे घ्या. त्याने प्लेटलेट काऊंट भराभर वाढतो.
पोपईच्या पानाचा रस काढताना पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून बारीक चिरून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात ब्लेंड करून रस गाळून घ्या.
त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन म्हणजेच पपेन नावाचे एंजाइम आहे. त्यामुळे पचनशक्ति वाढून रक्त मधील लाल रक्त कण वाढण्यास मदत होते.
5. डाळिंब: – डेंगूच्या आजारामद्धे अशक्तपणा दूर करून रक्त वाढण्यास डाळिंब फायदेमंद आहे. त्यामध्ये विटामिन ई, सी, ए व फोलिक एसिड तसेच एंटी ऑक्सीडेंट आहे. त्याच बरोबर रक्त वाढण्यास मदत होते.
6 मेथी: ताजी मेथीची भाजी सेवन केल्यास फायदेमंद होते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे शारीरिक पीडा व अनिद्राच्या समस्या दूर होतील. मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे सुद्धा उपयोगात आणू शकता.
7. गिलोय: गिलोय बऱ्याच रोगावर अमृत सारखे उपयोगी आहे. त्यामुळे रक्त वाढते व रोग प्रतिकार शक्ति वाढते. तुळशीची पान व गिलोय ह्याचा काढा सेवन केल्यास बरेच फायदे होतात. किंवा गिलोयचा जूस किंवा गोळ्या सुद्धा सेवन करू शकता. दिवसातून 2-3 वेळा गिलोय चा उपयोग केला तर डेंगू फायदेमंद होते.
8. बकरीचे दूध: डेंगूचा ताप आल्यावर बकरीचे दूध सेवन केल्यास बऱ्याच प्रमाणात फरक पडतो. त्यासाठी दिवसातून 2-3 वेळा कच्चे बकरीचे दूध सेवन करावे. त्यामुळे रक्त वाढून रोगप्रतिकार शक्ति वाढते. त्याचा उपयोग शरीराचे दुखणे व सांधेदुखी वर उपयोगी आहे.
9. व्हीट ग्रास: व्हीट ग्रासचा जूस काढून सेवा केल्याने रक्तातील प्लेटलेट्स वेगानी वाढतात व रोग प्रतिकार शक्ति वाढते. दिवसातून दोन वेळा सेवन केल्याने डेंगू चा खतरा कमी होतो.
10 सूप: जेवणाच्या आयवजी सूप सेवन करावे त्यामुळे तोंडाला चव येते व भूक लागत नाही अशी समस्या दूर होते. त्याच बरोबर गव्हाचा दलिया सेवन करावा त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
11. हर्बल टी – हर्बल टी चे सेवन केल्यानी शरीरातील हानिकारक तत्व बाहेर निघून जातात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते. हर्बल टी दिवसातून 2-3 वेळा सेवन करावा.