दिवाळी वास्तु टिप्स लक्ष्मी प्राप्तीसाठी
दिवाळीमध्ये काही वास्तु टिप्स उपयोगात आणून घरामध्ये धन-धान्य व प्रसन्नता आणा. दिवाळीमध्ये नातेवाईकांना भेटवस्तु देण्यासाठी म्हणा किंवा मित्र परिवाराला भेटवस्तु देण्यासाठी म्हणा किंवा घरात नवीन वस्तु खरेदी करण्यासाठी महिलाना खूप उत्साह असतो.
भारतात गृहलक्ष्मीला लक्ष्मीचे रूप मानले जाते व ह्या अश्या जिम्मेदारीच्या गोष्टी महिलाच पार पाडू शकतात. प्रतेक घरातील महिलेला म्हणजेच गृहिणीला वाटते की आपल्या घरामधील पूजाविधी परिपूर्ण संपन्न होउन लक्षीची कृपा आपल्या घरावर सदैव राहू दे.
The Vastu Tips For Diwali Pooja Vidhi Prosperity And Happiness At Our Home can of be seen on our YouTube Channel Vastu Tips For Diwali 2021 Pooja Vidhi
आपल्याला पुढील सोप्या वास्तु टिप्स वाचून खूप आनंद होईल व ह्या वास्तु टिप्स वापरुन आपल्याला वैभव देणारी लक्ष्मी माताची पूजा करून ती प्रसन्न होईल.माता लक्ष्मीला अश्या प्रकारे करा प्रसन्न
धन व वैभव देणाऱ्या लक्षीची कृपा कोणाला नको असते. ज्या घरात धन-धान्य व समृद्धी निवास करते तेथे सुख समृद्धी व आनंद असतो. लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी प्रेतक गृहिणी पूजा अर्चा करतात. ह्या वर्षी आपली पूजा अर्चा फलदाई होण्यासाठी व आपल्या घरात सुख संपत्ति येण्यासाठी काही सोप्या वास्तु टिप्स आहेत.
घरातील अडगळीचे सामान म्हणजे जुने डब्बे, जुने कपडे, चप्पल-बूट काढून टाका. अश्या प्रकारचे सामान घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते व त्याचा परिणाम आर्थिक परिस्थिति वर होतो. लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी विधीपूर्वक पूजा करा. त्याचा फायदा आपल्याला आर्थिक परिस्थितीवर होईल. आपण जेथे पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ व ताजी हवा व प्रकाश देणारी हवी.
घरातील दार व खिडक्या ना सरसुचे तेल लावा त्यामुळे दार खिडक्या उघडताना आवाज येणार नाही. घर सर्व चांगले साफ करा त्यामुळे लक्ष्मी माता खुश होईल व आपल्या घरात वास करील कारण लक्ष्मी माताला स्वच्छता अतिप्रिय आहे अस्वच्छ जागेवर लक्ष्मी माता वास करीत नाही.
घराचे मुख्य दार जर दक्षिण दिशेला असेल तर दारावर पिरामिड किंवा गणेश लक्ष्मीची प्रतिमा लावा म्हणजे वास्तुदोष राहणार नाही. जर आपल्या घराचे मुख्यदार पूर्व किंवा उत्तर दिशेला आहे तर ते विशेष प्रकारे सजवा त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
दिवाळीच्या सीझनमध्ये जर टीव्ही किंवा फ्रीज घेतला तर त्याचे तोंड उत्तर दिशेला होईल अश्या प्रकारे ठेवा. आपली ड्रॉइंग रूम चांगली सजवा त्यामुळे आपले घर प्रसन्न राहील.
लक्ष्मी पूजन्च्या दिवशी घरासमोर सडा रांगोळी काढून दिव्याने रोषणाई करा लक्ष्मी माताची पावल काढावी. संध्याकाळी दार उघडी ठेवावी. दरवाजावर स्वस्तिक काढा. फुलांचे तोरण लाऊन सजवा. लक्षी पूजन अगदी मनोभावे यथासांग करा जेणे करून लक्षी माता प्रसन्न होईल.
घरातील महिला किंवा गृहिणी घर जोडणारी व नाते संबंध टिकवून धरणारी असते. वास्तु शास्त्रा नुसार ज्या घरात महिलेचा आदर सत्कार होत नाही तेथे लक्षी येत नाही तेथे दारिद्र वास करते. आपल्या घरातिल महिला म्हणजे वयस्कर महिला हयाना आदर देवून त्यांना सन्मानाने वागणूक द्या.
बाथरूममध्ये वास्तु दोष असता आर्थिक समस्या येतात त्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
पूजाघरमध्ये चामडयाचे सामान किंवा चप्पल बूट आणू नका.
पूजाघर ठेवण्यासाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे ईशान्य कोन किंवा उत्तर व पूर्व ही जागा योग्य आहे.
पूजाघरामध्ये देवी देवतानाचे फोटो किंवा मूर्ती सोबत घरातील मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये.
आपले वैवाहिक जीवन सुख शांतीने जाण्यासाठी काही टिप्स
पूजा करताना आपण नेहमी ताजी फूल व फळ अर्पण करावी. जमिनीवर पडलेली फूल अर्पण करू नये. ज्या फुलाच्या पाकळ्या पडल्या असतील ती फुलसुद्धा अर्पण करू नयेत. किंवा सुगंध घेतलेली फुलसुद्धा अर्पण करू नये.
वास्तु शास्त्र नुसार फळ व फूल जशीच्या तशी अर्पण करावी ती कापून मग अर्पण करू नये.
पूजा करताना ध्वनिचे विशेष महत्व आहे. शंख, घंटानाद फक्त देवांनाच आवडतो असे नाही तर त्यामुळे वातावरण शुद्धी होते. तसेच शंख च्या आवाजानी बैक्टीरिया नष्ट होतात.