दिवाळी 2021 लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त पूजाविधी व महत्व
हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण शुभ मानला जातो. तसेच सुख-समृद्धिसाठी दिवाळी हा सण खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रमध्ये दिवाळी हा सण खूप धूम धड्याकट साजरा करतात.
The Diwali 2021 Lakshmi Pujan Shubh Muhurat Puja Vidhi And Importance of be seen on our YouTube Channel Diwali 2021 Lakshmi Pujan Shubh Muhurat
दिवाळी ह्या सणाचे महत्व:
पौराणिक काळा नुसार त्रेतायुग मध्ये जेव्हा श्री राम रावण चा वध करून परत आयोध्यामध्ये आले होते तेव्हा आयोध्या वासीयांनी श्री रामाचे स्वागत दिवे लाऊन केले होते. तसेच आपण दिवाळी घ्या सणाचे स्वागत दिवे लाऊन करतो.
दिवाळीच्या दिवशी श्री गणेश व माता लक्ष्मीची पूजा करतात. ह्यादिवशी घरा समोर सडा घालून रांगोळी काढतात. त्याच बरोबर पूर्ण घराला दिवे लाऊन सजवले जाते. श्री गणेश व माता लक्ष्मीची पूजा झाल्यावर बत्तासे, खीर किंवा गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवून सर्वाना वाटतात. मग सगळेजण एकमेकाला दिवाळीच्या शुभेछा देतात.
दिवाळी हा सण आनंदाचा सण आहे तो चार दिवस साजरा करतात. धनत्रयोदशी ते भाऊबीज ही चार दिवस साजरे करतात. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा कार्तिक महिन्याच्या अमावस्या ह्या दिवशी मुख्य दिवाळी म्हणजे लक्षी पूजन आहे. ह्या दिवशी माता लक्षीची व श्री गणेशजी ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात. ह्यावर्षी दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजन 4 नोव्हेंबर 2021 गुरुवार ह्या दिवशी आहे. त्यामुळे लक्षी माता व श्री गणेशजी ह्यांची कृपा नेहमी आपल्यावर राहते व आपल्याला कधी सुद्धा काही कमी पडत नाही. आपले घर, ऑफिस, कामाची जागा येथे पूजा करतात. 2 नोव्हेंबर पासून म्हणजेच धनत्रयोदशी ह्या दिवसापासून दिवे लावतात.
दिवाली 2021 तिथि व शुभ मुहूर्त:
हिंदू पंचांग अनुसार दिवाळी कार्तिक मास अमावस्या ह्या तिथिला साजरी करतात. ह्या वर्षी कार्तिक अमावस्या 4 नोव्हेंबर 2021 (गुरुवार) ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी चंद्राचे गोचर तुळा राशी मध्ये होणार आहे.
दिवाली 2021 शुभ मुहूर्त
दिवाली- 4 नोव्हेंबर 2021 (गुरुवार)
अमावस्या तिथि का आरंभ- 4 नवंबर 2021 (गुरुवार) सकाळी 06:03 पासून
अमावस्या तिथि का समाप्ती- 5 नवंबर 2021 (शुक्रवार) दुपारी 02:44 पर्यन्त
दिवाळीचे 4 दिवस असे आहेत:
-2 नोव्हेंबर 2021 (मंगलवार) ह्या दिवशी धनतेरस, धन्वंतरि त्रयोदशी, यम दीपदान, काली चौदस, हनुमान पूजा, गोवत्स द्वादशी, वसु बरस
-4 नोव्हेंबर 2021 (गुरुवार) ह्या दिवशी नरक चतुर्दशी, दिवाळी व महालक्ष्मी पूजन
-5 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार) ह्या दिवशी गोवर्धन पूजा, अन्नकूट, बलि प्रतिपदा म्हणजेच पाडवा
-6 नोव्हेंबर 2021 (शनिवार) ह्या दिवशी प्रतिपदा, यम द्वितिया, भाऊबीज
दिवाळी 2021 शुभ तिथि व पूजा मुहूर्त
अमावस्या तिथि प्रारंभ 4 नोव्हेंबर 2021 (गुरुवार) को सुबह 06:03 पासून
अमावस्या तिथि का समाप्ती 5 नवंबर 2021 (शुक्रवार) दुपारी 02:44 पर्यन्त
लक्ष्मी पूजा मुहूर्त- 4 नोव्हेंबर 2021 (गुरुवार) संध्याकाळी 6 वाजून 9 मिनट ते रात्री 8 वाजून 20 मिनट पर्यन्त
कालावधी – 1 तास 55 मिनट
प्रदोष काल मुहूर्त- संध्याकाळी 5 वाजून 34 मिनट ते रात्री 8 वाजून 10 मिनट पर्यन्त
वृषभ काल मुहूर्त- संध्याकाळी 6 वाजून 10 मिनट ते रात्री 8 वाजून 06 मिनट पर्यन्त
लक्ष्मी पूजन विधी:
लक्ष्मी पूजनची मांडणी करण्या अगोदर एक पणती लावावी व ती पणती सर्व घरात फिरवावी म्हणजे घरात कुठे अलक्ष्मी असेल तर ती निघून जाईन असे म्हणतात. घरात सर्व मंगलमय वातावरण ठेवावे. घरच्या मुख्य दारा समोर सडा घालून रांगोळी काढावी. दिवे लावावे.
1. लक्ष्मी पूजन करण्यासाठी अगोदर थोडी तयारी करून घ्यावी. त्यासाठी सर्व प्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी किंवा आपल्या घरातील पूजा घर जेथे आहे तेथे पूजा करावी. ज्या जागी पूजा करणार आहोत त्या जागी गंगाजल शिंपडून तेथे पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे. त्यावर तांदूळ घेऊन रांगोळी किंवा स्वस्तिक काढावे. तांदळाची रांगोळी काढल्यावर त्यावर लक्ष्मी माताची मूर्ती किंवा तसवीर सन्मान पूर्वक ठेवावी. मग उजव्या व डाव्या बाजूला एक मूठ गहू किंवा तांदूळ ठेवावे.
2. त्यानंतर कलश तयार करायचा त्यासाठी कलशमध्ये पाणी, सुपारी, झेंडूचे फूल, कॉईन, व थोडेसे तांदूळ घालावे. मग 5 आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वरच्या बाजूस ठेवावी. चौरंगाच्या बाजूनी फुले ठेवून सजावट करावी.
3. कलश तयार केल्यावर पूजाची थाळी तयार करावी. थाळीमध्ये तांदूळ ठेवा. मग थाळीमध्ये हळदिनी कमळ काढून घ्या. नंतर आपल्याला त्यावर लक्ष्मी माताची मूर्ती अभिषेक करण्यासाठी ठेवायची आहे. (आपण प्रथम पाटावर जी मूर्ती ठेवली आहे ती मूर्ती). मूर्तीच्या समोर काही कॉईन्स ठेवाव्या.
4. हिंदू धर्मा नुसार पूजा किंवा हवन करण्याच्या अगोदर प्रथम गणेशजीची पूजा केली जाते. कलश च्या शेजारी उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी. मूर्ती ठेवताना दक्षिण-पश्चिम ह्या दिशेला ठेवावी. मग हळद-कुंकू वाहून अक्षता वहाव्या.
5.त्यानंतर आपला काही उद्योग धंदा असेल त्याची वह्या पुस्तक देवाच्या समोर ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मग त्याच्या समोर दिवा लावावा.
6. साजूक तुपाच्या दिवा लाऊन पूजेच्या थाळीत ठेवावा. त्यावर हळद-कुंकू, अक्षता व फूल वाहावे. मग कलश वर हळद-कुंकू लावून अक्षता ठेवून फूल वहावे.
7. आता लक्ष्मी माताला आव्हान करावे. त्यासाठी मंत्र जाप करावा. डोळे बंद करून प्रार्थना करावी मग फूल व अक्षता अर्पण कराव्या.
8. आता देवी माताला हळदीने कमळ काढलेल्या ताम्हण किवा प्लेटमध्ये ठेवा व पंच अमृतनि स्नान घालावे मग शुद्ध पाणी सोडावे. मग पुसून ठेवावे. हळद कुंकू , अक्षता फूल वहावे. मग दिवा अगरबती लावावी.
9. पूजा झाल्यावर मिठाई चा नेवेद्य ठेवावा. समोर नारळ, पान सुपारी ठेवा. मग फळ, पैसे, धन ठेवावे.
10. पूजा झाल्यावर घरातील सर्व जनानी मिळून आरती म्हणावी. मग सुख समृद्धी, धन दौलत मिळावी म्हणूनप्रार्थना करावी. गणपतीजी ची आरती म्हणून प्रार्थना करावी.