कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी 2021 महत्व पूजा दीपदान महत्व
हिंदू धर्मामध्ये कार्तिक पूर्णिमाचे खूप महत्व आहे. ह्याच दिवसाला देव दिवाळी सुद्धा म्हणतात.
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा 2021 ह्या वर्षी 18 नोव्हेंबर 2021 गुरुवार दुपारी 12 सुरू होऊन समाप्ती 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी दुपारी 2 वाजून 26 मिनिट पर्यन्त आहे. म्हणजे कार्तिक पूर्णिमा 19 तारखेला आहे.
The Kartik Purnima Tripuri Purnima Dev Diwali 2021 Importance Puja Deep Daan Mahatva of be seen on our YouTube Channel Kartik Purnima Tripuri Purnima Dev Diwali 2021
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा ह्या दिवशी स्वर्गा मधून सर्व देव देवता पृथ्वीलोक वर येतात व पवित्र गंगा घाटावर स्नान करून मग ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. देव धर्तीवर येतात म्हणून घाटावर व प्रतेक देवळात दिवे लावण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी पूजा पाठ करण्याचे अधिक महत्व आहे. तसेच दीप दान करण्याचे महत्व आहे. तसेच ह्या दिवशी दानधर्म केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात.
कार्तिक पूर्णिमा ह्यादिवशी तुळशीची पूजा करण्याचे महत्व अधिक आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ह्या दिवशी तुळशीची पूजा केलीतर चांगली फळ मिळतात. तसेच ह्यादिवशी कार्तिक स्वामीच्या देवळात जाण्याचे महत्व आहे.तर ह्या दिवशी त्यांचे नक्की दर्शन घ्यावे.
दीपदान:
अगदी प्राचीन काळापासून कार्तिक ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. ह्या दिवशी देव पृथ्वी तलावावर येऊन गंगा स्नान करतात व सर्व ठिकाणी दिवे लावतात. व दिवे दान करतात. दीप दान करण्याचे महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व संकटांचा नाश होतो. व कर्ज मधून मुक्ती मिळते. कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण आपल्या घरच्या मुख्य दरवाजावर लावतात. व दिवाळी सारखेच दिवे लाऊन सजवतात.
तुळशीची पूजा:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी तुळशीच्या पूजे बरोबर शालिग्रामची सुद्धा पूजा करतात. ह्या दिवशी तुळशीची पूजा करण्याचे महत्व खूप आहे त्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. व त्याच बरोबर घरातील दारिद्रता दूर होते.
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरि पूर्णिमाचा उपवास: कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी उपवास करून पूजा अर्चा केली तर अग्निष्टोम यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. त्याच बरोबर उपवास केल्याने सूर्यलोक ची प्राप्ती मिळते. असे सुद्धा म्हणतात की कार्तिक पूर्णिमा पासून प्रेतक पूर्णिमाचे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दान धर्म केल्याचे महत्व:
कार्तिक पूर्णिमा ह्यादिवशी दान धर्म केल्याने दहा यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. ह्या दिवशी आपल्या आयपती प्रमाणे दान धर्म करावे. म्हणजेच अन्न दान, वस्त्र दान किंवा अन्य वस्तु दान करू शकतात. त्याने सुख समृद्धीचे आगमन होते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी दीपदान करून तुलशीची पूजा अवश्य करा.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी काय करावे किंवा काय करू नये.
ह्या दिवशी कोणाशी सुद्धा वादविवाद करू नये. त्याच बरोबर कोणा विषयी सुद्धा वाईट बोलू नये.
ह्या दिवशी शाकाहारी आहार सेवन करावा असे म्हणतात की ह्या दिवशी मांसाहारी जेवण सेवन केल्यास जीवनात संकट येतात.
ह्या दिवशी असहाय किंवा गरीब व्यक्तीचा अपमान करू नये. त्यामुळे आपल्या पुण्याचा नाश होतो.
असे म्हणतात की ह्या दिवशी आपली नख व केस कापू नयेत.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाला त्रिपुरी पूर्णिमा का म्हणतात.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव ने त्रिपुरासुर राक्षसचा वध केला होता म्हणून ह्या दिवसाला त्रिपुरी पूर्णिमा म्हणतात. म्हणून ह्या दिवशी दान धर्म करावा. ह्या वर्षी कार्तिक पूर्णिमा 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी आहे.