Vitamin D कमी झाले थंडीमद्धे होऊ शकतो त्रास त्याची लक्षण काय आहेत
विटामीन D कमी झाले त्यामुळे आपल्या सौदर्यामध्ये येऊ शकते बाधा ते कसे ते पहा
सूर्य प्रकाश हा विटामीन D वाढवण्याचा सर्वात सोपा व चांगला मार्ग आहे.
आपल्या स्कीनचा सूर्य प्रकाशाशी संपर्क आला की विटामीन D तयार होते. पण आपण आपल्या खाद्य पदार्थनी किंवा सप्लीमेंट्स नी सुद्धा विटामीन D वाढवू शकतो. विटामीन D आपल्या शरीरातील कैल्शियम व फास्फोरसला कंट्रोल करण्यास मदत करते. ते आपल्या इम्यून फंक्शनला दुरुस्त करते. त्यालाच सनशाईन विटामीन सुद्धा म्हणतात. आपले शरीर पूर्ण हेल्दी ठेवण्यास विटामीन D मदत करते. विटामीन D जर कमी झालेतर थंडीच्या सीझनमध्ये त्याचा फार त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये.
The Vitamin D Deficiency Symptoms can be seen on our YouTube Channel Vitamin D Deficiency Symptoms
विटामीन D ही आवश्यक पोषक तत्व आहे. आपल्याला जेवणातून तसेच सूर्य प्रकाशमधून सुद्धा विटामीन D मिळयास मदत होते. तसेच त्याच्या मुळे हाडांचे आरोग्य चांगले राहून तनाव कमी होतो व इम्युनिटी वाढण्याची महत्वपूर्ण भूमिका विटामीन D निभावते.
विटामीन D ची भूमिका:
आपण ह्या अगोदर पहिलेच आहे की विटामीन D आपल्याला सूर्य प्रकाशातून मिळते किंवा विटामीन D असणारे पदार्थ सेवन केल्याने सुद्धा आपल्याला त्यातून विटामीन D मिळते. विटामीन D चा स्तर शरीरातील कॅल्शियम व व फॉस्फरस कंट्रोल करण्यास मदत करते. त्याच बरोबर आपली रोग प्रतिकार शक्ति वाढून आपला साथीच्या रोगांपासून बचाव होतो व आपली हाड व दातांच्या समस्यापासून आपला बचाव होतो. अजून एक त्याचा फायदा म्हणजे तनाव व मूड कंट्रोल मध्ये राहतो. तसेच शरीराचे वजन कमी करण्यास फायदेमंद आहे.
विटामीन D कमी झाले तर त्याचे काय परिणाम होतात किंवा काय समस्या होऊ शकतात
विटामिन डी चे जसे फायदे आहेत तसेच ते कमी झाले तर त्याच्या पासून नुकसान सुद्धा होते. त्याचे परिणाम आपल्याला थंडीच्या दिवसांत जाणवू लागतात. कारण की थंडीच्या सीझनचा काही भरवसा नसतो कधी धुके असते तर ढगाळ हवा असते त्यामुळे सूर्य प्रकाश कमी मिळतो. त्यामुळे त्याच्या समस्या ह्या अदृश असतात. त्यामुळे दुर्लक्ष करू नये.
अशक्तपणा येतो:
विटामीन D कमी झाले तर अशक्तपणा व कमजोरी येते. त्यामुळे आपली रोजची काम करण्यास थोडा जास्त वेळ लागतो. त्याच्या मुळे मांस पेशी कमजोर होऊन जिना चढायला उतरायला त्रास होतो. खुर्ची उंच असेलतर बसताना व उठताना त्रास होतो. त्यामुळे चालताना लडखळायला होते.
हाडांमद्धे दुखणे चालू होते:
विटामीन D कमी झालेतर ‘रिकेट्स’ होऊ शकतात. हे लहान मुले ह्याचा शिकार बनतात कारण की त्यांची हाड मुलायम व सॉफ्ट असतात. विटामीन D हाडे मजबूत करते वयस्कर लोक ह्याचा शिकार बनतात व त्यांना ऑस्टियोमलेशिया होऊ शकतो.
शरीरातील विटामिन डी स्तर कमी झाला ते कसे ओळखायचे
विटामिन डी कमी झाले का नाही ते ब्लड टेस्ट (Blood test) करून समजते. त्यासाठी 25-हाइड्रॉक्सीविटामिन डी ही टेस्ट आहे त्यालाच 25 (ओएच) डी म्हणून सुद्धा ओळखले जाते.