अन्नपूर्णा जयंती तिथि, महत्व, पूजाविधी, कथा व मंत्र
माता अन्नपूर्णा पार्वती माताचे रूप आहे. जेव्हा पृथ्वीवर अन्न व पाण्याची कमी निर्माण झाली तेव्हा अन्नपूर्ण माता प्रकट झाली होती.
The Annapurna Jayanti 2021 Tithi Puja Vidhi Katha Mahatva And Mantra can be seen on our YouTube Channel Annapurna Jayanti 2021
दरवर्षी मार्गशीष महिन्यात पूर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात. असे म्हणतात की ह्या तिथीला माता पार्वतीच्या रूपात साजरी करतात. एकदा पृथ्वीवर अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे प्राणी पाण्यासाठी तरसले होते तेव्हा त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी माता पार्वती अन्नची देवी अन्नपूर्णा ह्या रूपात अवतरली होती.
ह्या वर्षी अन्नपूर्णा जयंती 19 डिसेंबर 2021 रविवार ह्या दिवशी आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी अन्नपूर्णा माताची मनापासून पूजा अर्चा केल्याने परिवारमध्ये कधीसुद्धा अन्न, पाणी व धन धान्यची कमतरता पडत नाही. आपण ह्या दिवसाचे काय महत्व आहे व माता अन्नपूर्णाची पूजाविधी पाहूया.
अन्नपूर्णा जयंती महत्व:
अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश म्हणजे लोकाना अन्नाचे महत्व समजले पाहिजे. अन्ना पासूनच आपल्याला जीवन मिळते म्हणून अन्नाची नासाडी कधी सुद्धा करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घराची साफसफाई करून गॅसची व अन्नाची पूजा करावी. त्याच बरोबर ज्याना अन्नाची गरज आहे किंवा गरीब लोकाना अन्न दान करावे, त्यामुळे माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होऊन आपल्या भक्तावर कृपा ठेवून नेहमी घरामध्ये बरकत राहते. व पुढच्या जन्मी सुद्धा धन धान्यची कमतरता होत नाही.
पूजा विधि
अन्नपूर्णा जयंती ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजाघर व स्वयंपाक घर साफ करून गंगाजल शिंपडावे मग गॅसवर कुंकूने स्वस्तिकची चिन्ह काढावे त्यावर हळद कुंकू अक्षता, फूल ठेवून पूजा करावी. मग गॅसच्या जवळ चौरंग ठेवून त्यावर वस्त्र घालावे एका पितळी किंवा तांब्याच्या धातूची प्लेट किंवा वाटी घेऊन त्यावर तांदूळ ठेवावे. त्यावर माता अन्नपूर्णाची मूर्ती अभिषेक करून ठेवावी. मग हळद-कुंकू, अक्षता व फूल वहावे. शेजारी गणपतीची मूर्ती ठेवावी. हळद कुंकू, अक्षता फूल वहावे. दुधाची खीर नेवेद्य ठेवावा. तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी. पूजा झाल्यावर अन्न दान करावे.
कथा:
पौराणिक मान्यता अनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमी झाली आहे व लोक भुकेनि मरत आहेत. त्रासानी लोक बेजार होऊन त्यांनी ब्रह्मा विष्णुना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा विष्णुनि शिवजीना झोपेमधून जागे केले व ह्या समस्या मधून लोकांची सुटका करण्यास सांगितले. तेव्हा शिवजीनि स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले मग माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप घेऊन पृथिवर प्रकट झाली. त्यानंतर शिवजी
पृथ्वीवर भिक्षुकचे रूप धरण करून माता अन्नपूर्णाकडे तांदळाची भिक्षा मागितली त्यानंतर ते तांदूळ त्यांनी भुकया लोकांमध्ये वाटले तेव्हापासून पृथ्वीवर अन्न व पाणीचे संकट नष्ट झाले. ज्या दिवशी पार्वती माता पृथ्वीवर प्रकट झाली तो दिवस मार्गशीष पूर्णिमा होती. तेव्हा पासून माता अन्नपूर्णाचा अवतरण दिवस मानला जातो.
टीप: जर आपल्या घरी अन्नपूर्णाची मूर्ती आणायची असेलतर मार्गशीष पूर्णिमा हा दिवस चांगला आहे त्या दिवसा पासून पूजा करावी. किंवा कोणत्या सुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती आणावी. मूर्ती देवघरात ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीत तांदूळ ठेवून ठेवावी. आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावे व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदळात मिक्स करून परत दुसरे तांदूळ ठेवावे.
अन्नपूर्णा मन्त्र
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।