क्रिसमस प्लम फ्रूट केक बिना अंडे बिना अल्कोहोल तोंडात टाकताच विरघळणारा
डिसेंबर महिना आला की आपल्याला नेटवर किंवा यूट्यूब वर वेगवेगळे केक रेसीपी पाहायला मिळतात. व आपण त्याच्या प्रमाणे घरी बनवतो सुद्धा आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारच्या केकच्या रेसीपी पाहिल्या आहेत.
The Christmas Fruit & Nut Plum Cake Eggless No Alcohol can be seen on our YouTube Channel Christmas Fruit & Nut Plum Cake Eggless No Alcohol
क्रिसमस प्लम फ्रूट केक हा डिसेंबर महिन्यात अगदी आवर्जून बनवला जातो. प्लम फ्रूट केक हा चवीला अप्रतिम लागतो. नाताळ ह्या सणाला हा केक लोक बनवतातच. त्याच प्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा अश्या प्रकारचा केक ठिकठिकाणी पाहायला मिळतो.
प्लम फ्रूट केक बनवताना ड्रायफ्रूट जास्त प्रमाणात वापरली जातात. त्याच प्रमाणे त्यामध्ये रम किंवा वाईन सुद्धा वापरतात. पण बरेच जण केक बनवताना त्याना अंडे किंवा अल्कोहोल चालत नाही त्यांच्यासाठी आपण क्रिसमस प्लम फ्रूट केक बिना अंडे बिना अल्कोहोल कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 45-50 मिनिट
वाढणी: 8-10 जणांसाठी
साहित्य:
1 कप ऑरेंज संत्र्याचा ज्यूस
1 ½ कप ड्रायफ्रूट (किसमिस, काळे मनुके, काजू, अक्रोड, टूटी फ्रूटी लाल हिरवी व पिवळी)
¼ कप साखर (कैरेमल शुगर बनवण्यासाठी)
1 ¾ कप मैदा
2 टे स्पून कोको पाऊडर
1 टी स्पून बेकिंग पाऊडर
½ टी स्पून बेकिंग सोडा
¼ टी स्पून जायफळ पाऊडर
½ टी स्पून दालचीनी पाऊडर
¼ टी स्पून लवंग पाऊडर
½ कप बटर
¾ कप दूध
½ कप साखर
½ टी स्पून व्हेनिगर
कृती: प्रथम 3 मध्यम आकाराच्या संत्र्याचा ज्यूस काढून घ्या. सर्व ड्राय फ्रूटचे तुकडे करून घ्या.
मग संत्र्याच्या ज्यूसमध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे 2 तास भिजत ठेवा. बेकिंग ट्रेला बटर लाऊन घ्या.
एका भांड्यात साखर व ½ टे स्पून पाणी घालून मंद विस्तवावर साखर विरघळवून तीचा रंग ब्राऊन होई पर्यन्त गरम करा. साखरेचा रंग थोडा ब्राऊन झालकी त्यामध्ये ¼ कप पानी हळू हळू घालून मिक्स करून घ्या. थोडे गरम झाले की विस्तव बंद करून थंड करायला ठेवा.
एका प्लेटमध्ये चाळणी घेऊन त्यामध्ये मैदा, कोको पाऊडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचीनी पाऊडर, जायफळ पावडर, लवंग पावडर घालून चाळून घेऊन बाजूला ठेवा.
एका बाउल मध्ये ½ कप साखर, दूध, बटर व (कैरेमल शुगर घेऊन साखर विरघळेस तोवर हलवून घ्या. मग त्यामध्ये मैदा, ऑरेंज ज्यूस व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून व्हेनिगर घालून मिक्स करून घ्या. मायक्रोवेव प्रीहिट करून घ्या.
आता सर्व मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये घालून एकदा टॅप करा म्हणजे त्यामध्ये एयर राहणार नाही. मग वरतून बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट घालून सजवा.
मायक्रोवेव प्रीहिट झाल्यावर कानव्हेशन मोडवर 50 मिनिट साठी सेट करून बेकिंग ट्रे ठेऊन केक बेक करून घ्या.