दही व किसमिस (एक कटोरी दही + 4-5 किसमिस) फायदे हैरान करणारे
दही व किसमिस आपण कधी सेवन केले आहे का? करून पहा. पण दही व किसमिस सेवन करण्याची एक ठराविक वेळ पाळली तर त्याचे अनगिनत फायदे होऊ शकतात.
आपण जेवणात दही नेहमी सेवन करतो व ते सर्वाना आवडत ईसेच आपण दहयाची कोशिंबीर किंवा कढी किंवा ताक घेतो. दही सेवन केल्याने आपली पचन क्रिया वाढते म्हणजेच चांगली होते. व त्याच बरोबर त्वचा सुद्धा चमकदार बनते. जर आपण दहयामध्ये किसमिस मिक्स करून सेवन केलेतर अजून चांगले फायदे मिळतात. पण ठराविक वेळेला सेवन करावे. आपण जाणून घेऊया त्याची वेळ व ते कसे सेवन करावे.
The Curd With Raisins Eating Super Health Benefits can be seen on our YouTube Channel Curd With Raisins Eating Super Health Benefits
दही सेवन करण्याची वेळ:
दही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. पण आयुर्वेदामध्ये म्हणतात की जर आपण चुकीच्या वेळी दही सेवन केलेतर त्याचा उलट परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये म्हणतात की रात्रीच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये. कारण त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.
दही व किसमिस कधी सेवन करावे?
दही व किसमिस सेवन करण्याची वेळ म्हणजे दुपारची योग्य वेळ आहे. किंवा सकाळी ब्रेकफास्टची वेळ सुद्धा चालू शकते. किंवा दुपारी 3-4 ह्या वेळेत सुद्धा सेवन करू शकता. आपण एक कटोरी दहयामध्ये फक्त 4-5 किसमिस घालून सेवन करू शकता.
दही व किसमिस सेवन करण्याचे फायदे:
दही व किसमिस सेवन केल्याने शरीरात गुड बैक्टिरियाची वाढ होते. त्याच बरोबर पोटातिल सूज सुद्धा कमी होते. त्याच बरोबर आपली हाडे मजबूत बनतात. त्याच बरोबर वाढलेले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी फायदेमंद आहे.
1. दांत व हाडे मजबूत बनतात:
आपले दात व हाडे मजबूत बनण्यासाठी कॅल्शियमची जरूरत आहे. अश्या वेळेस आपण दही व किसमिस सेवन करू शकता. आपल्याला माहीत आहे का? 100 ग्राम किसमिसमध्ये 50 एमजी कॅल्शियम असते. त्याने आपले दांत व हाडे मजबूत राखण्याचे कार्य करतात.
2. पचनक्रिया सुधारते:
काही जणांमद्धे बुद्धकोष्टताच्या समस्या असतात. तर त्यांनी रोज किसमिस भिजवून सेवन करावे. जर आपण नियमित किसमिस सेवन करत असाल तर पचनकियाच्या समस्या पासून आपल्याला आराम मिळू शकतो.
3. वाढत्या वयातील सुरकुत्या:
जसजसे आपले वय वाढायला लागते तसतसे आपल्या त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात दही व किसमिसचे सेवन केल्यास सुरकुत्या कमी होतात.
4. नेहमी तरुण राहण्यासाठी:
जर तुम्हाला नेहमी तरुण रहायचे असेलतर किसमिस पाण्यात भिजवून मग सेवन सुरू करू शकता. रात्री पाण्यात किसमिस घालून एक उकळी आणा व सकाळी उठल्यावर ते पाणी सेवन करा. त्यामुळे आपण नेहमी तरुण दिसाल.
5. रोग प्रतिकार शक्ति वाढते:
रात्री किसमिस पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास रोग प्रतिकार शक्ति वाढते. त्याच्या मध्ये असणारे एंटीऑक्सिडेंट्स त्यामुळे इम्यूनिटी वाढते. त्यामुळे बाहेरील वायरस व बैक्टीरियाशी लढण्याची शक्ति वाढते. म्हणजेच बैक्टीरिया शरीरात प्रवेश करू शकत नाही.
6. पुरुषांसाठी दही किसमिस सेवन करणे फायदेशीर:
दहीच्या सेवन मुळे पुरुषांमधील सीमेन क्वालिटी इम्प्रूव हिन्यास मदत होते, तसेच दही सेवन केल्याने बरेच रोगांपासून आपण दूर राहू शकतो.
तळलेले पदार्थ सेवन करणे शरीरासाठी खतरनाक:
आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण काही सुद्धा सेवन करतो. तेव्हा आपल्या लक्षात तेत नाही की ते हेलडी आहे की नाही. तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. दही किसमिस आपल्या आरोग्याच्यासाठी चांगले आहे. जर दहयामध्ये मध मिक्स करून सेवन केल्यास जास्त फायदेशीर आहे. ते आपल्या शरिरात एंटीबायोटिक सारखे काम करते.