गायत्री मंत्र जाप करण्याचे फायदे आइकून तुम्ही सुद्धा रोज मंत्र जाप सुरू कराल
गायत्री मंत्र जगातला सर्वात प्रभावशाली मंत्र मानला जातो. शास्त्रामध्ये सुद्धा गायत्री मंत्रला शक्तिशाली मंत्र मानले जाते. गायत्री मंत्रचा जाप करण्यासाठी कोणतीसुद्धा विशिष्ट अशी वेळ नाही आपण कोणत्यासुद्धा वेळेला आपण मंत्रजाप करू शकतो. तरी पण जर तुम्ही एका ठराविक वेळी व व ठराविक नियमा नुसार मंत्र जाप केला तर त्याचे तुम्हाला बरेच फायदे होऊ शकतात व आपल्या समस्यांचे निराकरण सुद्धा होऊ शकते. रोज मंत्र जा केल्याने मनशांति मिळून आपले जीवन सुखी समाधानी होऊ शकते. गायत्री मंत्र हा खूप लाभदायक मंत्र आहे.
The Gayatri Mantra Jaap Benefits can be seen on our YouTube Gayatri Mantra Jaap Benefits
आता आपण जाणून घेवू या की त्याचे काय काय फायदे आहेत.
1) गायत्री मंत्र जाप करण्याची पहिली वेळ म्हणजे पहाटे किंवा सूर्योदय होण्याच्या थोडावेळ अगोदर मंत्र जाप सुरू करावा.
2) गायत्री मंत्रचा जाप दुपारी सुद्धा करू शकता.
3) संध्याकाळी गायत्री मंत्रचा जाप करायचा असेलतर सूर्यास्त होण्याच्या अगोदर सुरू करून सूर्यास्त झाल्यावर मग बंद करावा.
गायत्री मंत्र व त्याचा अर्थ:
ॐ भूर् भुवः स्वः।
तत् सवितुर्वरेण्यं।
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात् ॥
गायत्री मंत्राच्या शब्दाचा अर्थ:
ॐ – परब्रह्म, भू – पृथ्वी, भुव- अंतरिक्ष, स्व – स्वर्ग, तत्- त्या, सवितु – सूर्य, वरेण्यं – प्रार्थनीय, भर्गो- पाप चिरडून टाकणे, देवस्य – प्रकाशमान, धीमहि- चिंतन करणे, धियो- बुद्धी, यो- जो, न: आमच्या, प्रचोदयात् – प्रबल प्रेरणा देणे.
गायत्री मंत्राचा अर्थ:
स्वर्ग-मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांत व्यापून टाकणाऱ्या, सर्व श्रेष्ठ परमतत्व श्री सूर्य नारायणाचे आपण ध्यान करतो. हे सूर्यदेव आमच्या बुद्धीला श्रेष्ठता आणि उत्तम कर्म करण्यास प्रवृत्त करा.
लाभ
उत्साह आणि सकारात्मकता वाढून नाकारात्मकता नष्ट होते..
त्वचेला कांती येऊन चेहरा तेजस्वी बनतो.
वाईट गोष्टींपासून मनाला मुक्ती मिळते म्हणजेच नेहमी सकारात्मक विचार येतात.
धर्म आणि सेवा कार्यात मन रमतं.
आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते.
स्वप्न सिद्धी प्राप्त होते.
क्रोध शांत होऊन मन नेहमी शांत राहते.
गायत्री मंत्र म्हणण्याचे फायदे:
1) विद्यार्थीसाठी गायत्री मंत्राचा जाप करणे खूप फायदेमंद आहे. त्याच्या मुळे मन एकाग्र होऊन ज्ञानामध्ये वृद्धी होते. ज्या मुलांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांची स्मरणशक्ती मंत्र जाप केल्याने वाढते. ज्याना शिक्षणात प्रगती करायची आहे त्यांनी नियमित गायत्री मंत्रचा जाप करावा.
2) असे म्हणतात की गायत्री मंत्राचा जाप केल्याने जीवनात उत्साह व सकारात्मकता येऊन अगदी खराब झालेली परिस्थिति पण सुधारते व ती पार पडण्यासाठी शक्ति मिळते. त्याच्यामुळे व्यक्ति चांगल्या मार्गाला लागून धर्म व सेवा करण्याच्या कार्यात मग्न होतो. व त्याच्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.
3) जर कोणत्या व्यक्तिला जास्त प्रमाणात क्रोध म्हणजेच राग येत असेलतर त्यांनी गायत्री मंत्राचा नियमित जाप करावा. त्यामुळे मन शांत राहून रागावर नियंत्रण आणण्याची शक्ति मिळून हळू हळू ती व्यक्ति शांत होते.
4) असे म्हणतात की नियमित गायत्री मंत्र जाप केल्याने सिद्धी प्राप्त करू शकतो. ह्या मंत्र सफलता देतो. जर आपल्या कोणत्या कार्यात अडथळे येत असतील तर गायत्री मंत्रचा नियमित जाप करावा त्यामुळे आपली कार्य सिद्धी होते
5) गायत्री मंत्राचा नियमित जाप केल्याने जर कोणत्या रोगानी त्रस्त असालतर त्यामुळे चेहऱ्यावर तेज येऊन शरीर निरोगी बनण्यास मदत होते. त्याच बरोबर मंत्र जाप केल्याने डोळ्यात तेज येते.
6) गायत्री मंत्राचा जाप केल्यामुळे कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो त्यामुळे मानसन्मान व सरकारी कामे लवकर होण्यास मदत होते. म्हणून सूर्य देवाला प्रसन्न करून गायत्री मंत्र नियमित म्हणावा.
7) वास्तूशास्त्रा नुसार घरात नियमित गायत्री मंत्राचा जाप केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन वास्तूदोष निघून जातो.