मार्गशीर्ष पूर्णिमा 2021 शुभ मुहूर्त, पूजा विधि, महत्व, उपाय
हिंदू धर्मामध्ये मार्गशीष पूर्णिमा ही खूप शुभ मानली जाते. ह्या दिवशी श्री नारायण व माता लक्ष्मी ह्यांची मनापासून पूजा अर्चा केल्यास मोक्ष मिळण्याचा मार्ग खुला होतो असे म्हणतात. म्हणूनच शास्त्रामध्ये ह्या पूर्णिमाला मोक्षदायिनी असे म्हणतात. आता आपण पाहू या मार्गशीर्ष पूर्णिमा की तिथि, शुभ मुहूर्त, पूजा विधि व महत्व काय आहे.
The Margashirsha Purnima 2021 Shubh Muhurat Puja Vidhi Mahatva Upay can be seen on our YouTube Channel Margashirsha Purnima 2021
शास्त्रामध्ये प्रतेक पूर्णिमा व अमावस्याचे महत्व असते. पण मार्गशीष पूर्णिमाचे महत्व अधिक असते. असे म्हणतात की मार्गशीष पूर्णिमा व्यक्तिला मुक्ती देते. म्हणूनच ह्या पूर्णिमाला मोक्षदायिनी म्हणतात. ह्या दिवशी दान, ध्यान, व स्नान ह्याचे विशेष महत्व आहे व त्याची 32 पट आपल्याला फळ प्राप्त होते.
शुभ मुहूर्त:
मार्गशीष पूर्णिमा शुभ आरंभ 18 डिसेंबर 2021 शनिवार सकाळी 7 वाजून 24 मिनिट
व समाप्ती 19 डिसेंबर 2021 रविवार सकाळी 9 वाजून 13 पर्यन्त
पूजा विधि:
मार्गशीर्ष पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान नारायण ह्यांचे मनातल्या मनात ध्यान करून व्रत करण्याचा संकल्प करावा. स्नान करण्याच्या वेळी पाण्यात थोडे गंगाजल व तुळशीची पाने घालावी. मग पाण्याचा मग भरून आपल्या कपाळाला लाऊन देवाचे नाव घेऊन नमस्कार करून मग स्नान करावे. मग स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा घरात श्री हरी व माता लक्ष्मी ह्यांचा फोटो स्थापित करून हळद-कुंकू, चंदन, फूल, धूप दीप व नेवेद्य दाखवून हवन करावा. मग ‘ॐ नमो भगवते वासु देवाय नम: स्वाहा इदं वासु देवाय इदं नमम’ हा मंत्र बोलत 11, 21, 51 किंवा 108 वेळा आहुति द्यावी. व आपली काही चूक झाली असेल तर माफी मागावी.
पूजा झाल्यावर दान धर्म करावा:
पूजा झाल्यावर आपल्या आयपती प्रमाणे दान धर्म करावा. जर आपल्या कुंडलीत चंद्राची स्थिति कमजोर असेल तर ह्या दिवशी पांढरे म्हणजे दूध, खीर, तांदूळ किंवा मोती दान करावे. जर व्रत म्हणजे उपवास ठेवला असेलतर त्या दिवशी तरी नारायण भगवान ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती जवळ झोपावे मग सकाळी उठून स्नान करून पूजा अर्चा करून जरूरत मंदला दान धर्म करून मग उपवास सोडावा.
मार्गशीर्ष पूर्णिमाचे महत्व:
असे म्हणतात की मार्गशीर्ष पूर्णिमा ह्या दिवशी शुभ कार्य केलेतर त्याचे 32 पटीने फळ प्राप्त होते. म्हणूनच ह्या दिवसाला बत्तीसी पूर्णिमा असे सुद्धा म्हणतात. ही तिथी माता लक्ष्मीला सुद्धा अतिप्रिय आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मीला खीरचा नेवेद्य दाखवावा. त्याच बरोबर घरात सत्यनारायणची कथा वाचावी. त्यामुळे सर्व पापांचा नाश होऊन मुक्ती मिळते. परिवारातील संकट दूर होऊन सुख शांती समृद्धी मिळते.
मार्गशीर्ष पूर्णिमाही दिवशी सूर्य व चंद्र ठीक समोरा समोर येतात. म्हणून ह्या दिवशी चंद्र ग्रह शांत करण्यासाठी उपाय केले जातात. ह्या दिवशी चंद्राचा प्रभाव मनुष्यवरती जास्त प्रमाणात होतो.
मार्गशीर्ष पूर्णिमा ह्या दिवशी खाली दिलेले उपाय जरूर करावे:
1. मार्गशीर्ष पूर्णिमा ह्या दिवशी रात्री माता लक्ष्मीची विधी पूर्वक पूजा अर्चा करावी. त्यांना 11 कवड्या अर्पित करून हळद-कुंकू वाहा. मग रात्रभर माला लक्ष्मीच्या जवळ त्या कवड्या ठेवाव्या व दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्वच्छ कापडात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवाव्या. त्यामुळे धन व सौभाग्य वृद्धी होऊन माता लक्ष्मीची कृपा राहते.
2. मार्गशीर्ष पूर्णिमाह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की पिपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो.
3. मार्गशीर्ष पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीचा मंत्र जाप करावा त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.