सफला एकादशी डिसेंबर 2021 शुभ-मुहूर्त, एकादशी महत्व व मंत्र
सफला एकादशी ही सर्व एकादशीमध्ये महत्वपूर्ण मानली जाते. एकादशी व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले जाते. पंचांगनुसार आता 22 डिसेंबर पासून पौष महिना चालू झाला आहे. पंचांगनुसार एकादशी कधी आहे व त्याचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊ या.
The Saphala Ekadashi 2021 Shubh Muhurat Mahatva And Mantra can be seen on our YouTube Saphala Ekadashi 2021
सफला एकादशी कधी आहे?
हिंदू पंचांग अनुसार 30 डिसेंबर 2021 ह्या वर्षाच्या शेवटी आहे एकादशी आहे. पौष महिन्यात कृष्ण पक्ष एकादशी ह्या तिथीला सफला एकादशी आहे. पौराणिक मान्यता अनुसार एकादशीला विधी पूर्वक पूजा, अर्चा व उपवास केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व त्याच बरोबर भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद मिळतो. त्याच बरोबर सर्व कार्यात यश व सफलता मिळते. सफला एकादशीचे व्रताच्या दिवशी श्री हरी व माता लक्ष्मी ह्यांची पूजा करतात. पण सफला एकादशी ह्या दिवशी रात्री जागरण करणे आवश्यक आहे व भजन कीर्तन केल्याने लाभ मिळतो.
सफला एकादशी व्रत महत्व:
शास्त्रा अनुसार एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आपल्या परिवारात कोणत्या सुद्धा एका व्यक्तिने एकादशीचे व्रत केल्यास सर्व पाप नष्ट होतात. सफला एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होते. म्हणूनच सफला एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तिने दशमी तिथी ह्या दिवशी फक्त रात्री एकदाच भोजन करावे.
सफला एकादशी व्रत शुभ मुहूर्त:
एकादशी तिथि प्रारम्भ – 29 डिसेंबर 2021 दुपारी 04 वाजून 12 मिनट पासून
एकादशी तिथि समाप्त – 30 डिसेंबर 2021 दुपारी 01 वाजून 40 मिनट पर्यन्त
धार्मिक मान्यता अनुसार असे म्हणतात की ह्या दिवशी व्रत केल्यास व्यक्तिच्या सर्व दुखांचा नाश होऊन सुख समृद्धीचे आगमन होते. ह्या दिवशी देवाचे नामस्मरण केल्याने मृत्यु नंतर बैकुंठची प्राप्ति होते. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा करून खाली दिलेल्या मंत्राचा जाप करावा.
सफला एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु हीचा मंत्र जाप करावा:
1. ॐ नमो भगवते वासुदेवाय
2. ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीवासुदेवाय नमः
3. ॐ नमो नारायणाय