घरामध्ये लावलेला आरसा बदलू शकते आपली किस्मत फेंगशुई टोटके
घरामध्ये लावलेला आरसा आपली किस्मत बदलू शकतो किंवा उलट बिघडवू शकतो. फेंगशुई च्या मदतीने जाणून घ्या ते कसे.
फेंगशुई टोटके मध्ये वेगवेगळ्या वस्तु वापरल्या जातात त्यामध्ये एक म्हणजे आरसा होय. चुकीच्या पद्धतीने लावलेला आरसा किंवा चुकीच्या आकाराचा आरसा आपल्या घरातील सुख-समृद्धी व आनंद हिरावून घेऊ शकतो. जर तोच आरसा योग्य जागेवर लावला तर त्याचे परिणाम चांगले होऊन आपली सुख-समृद्धी परत येऊ शकते. आता आपण जाणून घेऊ या ते कसे.
The Tips For Placing Mirrors At Home According To Feng Shui can be seen on our YouTube Channel Tips For Placing Mirrors At Home According To Feng Shui
1) बऱ्याच वेळा असे होते की लोक एंटीक सामान गोळा करण्यामध्ये चुकीच्या आकाराचे आरसे उचलून आणतात व नको त्या ठिकाणी लावतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण आपल्या घरात जानवरांचे चेहरे लावतो किंवा शरीराच्या आकाराचे आरसे लावतो ते चुकीचे आहे असे लाऊ नये.
2) फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा घरात कधी लावू नये. जर आपण अश्या तडा गेलेल्या आरशात आपला चेहरा बघत असाल तर आपण आपली बदकिस्मतिला आमंत्रण देत आहोत. त्यामुळे धन-संपत्तिची हानी होते.
3) घराच्या मुख्य दरवाजावर आरसा लावताना असा लावू नये की त्या आरशात घरातील प्रतिबिंब बाहेरच्या लोकांना दिसेल. तर असा लावावा की बाहेरच्या माणसाला आपला स्वतः चा चेहरा दिसेल नाकी आपला त्याच्या मुळे वाईट शक्ति दूर जाईल.
4) जनिमीच्या काही उंचीवर आरसा लावावा त्यामुळे व्यापारामध्ये वृद्धी होईल. घरातील काही वास्तु दोषचे सुद्धा निवारण होईल. त्यासाठी वास्तुशस्त्र जाणत असणाऱ्या व्यक्तिचा सल्ला घेतला पाहिजे.
5) बेडरूममध्ये आपल्या बेडच्या जवळपास आरसा असू नये जेणेकरून आपण व आपला साथीदार त्या आरश्यात दिसेल. जर आपल्या बेडच्या जवळ आरसा असेल तर लगेच त्याची जागा बदलून टाका. नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दरार येऊ शकते.
6) घरामध्ये ज्या कपाटात आपण आपले पैसे ठेवतो त्या कपाटाला आरसा पाहिजे त्यामुळे धनलाभ होऊन करियरमध्ये वृद्धी होते.
7) घरामध्ये पायऱ्या असतील तर पायरीच्या खाली लोक सजावट करण्यासाठी आरसा लावतात पण असे करू नये कारण की त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. व चांगली नाती खराब होतात.
8) आरसा वापरुन एक टोटका करून पहा त्यामुळे घरामध्ये सुख-शांती व पैशाचे आकर्षण होईल. त्यासाठी आपल्याला एक छोटा म्हणजे 2-3 इंच असलेला आरसा घ्यायचा आहे तो आपल्या घरच्या मुख्य दरवाजाच्या म्हणजे घरात येताना डाव्या बाजूला तो आरसा जमिनीवर ठेवून त्यावर एक एक रुपयांचे तीन कॉईन त्रिकोणी आकारात ठेवायचे आहे मग त्यावर एक छोटीशी झाडाची कुंडी ठेवायची आहे. आपण मनीप्लांट किंवा कोणते सुद्धा शोभेचे झाड ठेवू शकता पण त्या झाडाला काटे नसावे किंवा त्याचे पान किंवा फांदी तोंडल्यास त्यामधून दूध येता कामा नये. अश्या प्रकारचा टोटका केल्याने घरात पैशाचे आकर्षण होते व पैसा घरात टिकून राहतो.