क्रिसमस वाईन चेरी केक रेसीपी
आता डिसेंबर महिना चालू झालाकी आपल्याला बाजारात नानाविध प्रकारचे केक पहायला मिळतात. आपण घरी सुद्धा वेगवेगळे केक बनवतो. आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर किंवा रॉयल शेफ सुजाता ह्या वेब साईटवर पण नानाविध प्रकारच्या केकच्या रेसिपी पाहू शकता. व त्या केकच्या रेसीपी खूप सोप्या व सहज घरी बनवता येणाऱ्या आहेत.
The Traditional Christmas Wine Cherry Cake can be seen on our YouTube Channel Christmas Wine Cherry Cake
केक आपणा सर्वाना आवडतो. लहानमुले तर अगदी आवडीने खातात. ह्या अगोदरच्या विडियो किंवा साईटवर आपण क्रिसमस फ्रूट प्लम केक बिना अंडे बिना अल्कोहोल कसा बनवायचा ते पहिले. आज आपण पारंपारिक क्रिसमस वाईन चेरी केक अंड्याचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
क्रिसमस वाईन चेरी केक मस्त टेस्टी लागतो. क्रिसमस वाईन चेरी केक बनवायला अगदी सोपा आहे. ह्या नाताळमध्ये क्रिसमस वाईन चेरी केक बनवून नक्की पहा सर्वाना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6-8 जणसाठी
साहीत्य:
1 ½ कप मैदा
4 अंडी
½ कप किंवा 4 टे स्पून वाईन
1 कप बटर
1 कप साखर
1 टी स्पून दालचीनी पावडर
1 टी स्पून बेकिंग सोडा
½ टी स्पून बेकिंग सोडा
1 चिमूट मीठ
1 मध्यम आकाराचे लिंबू (त्याची साल किसून काढा)
7-8 बदाम (चिरून)
2 टे स्पून किसमिस
15 चेरी (तुकडे करून)
कृती: प्रथम लिंबूची साल किसून घ्या. बदाम व चेरी तुकडे करून घ्या. एका बाउलमध्ये हे सर्व मिक्स करून बाजूला ठेवा. बेकिंग ट्रेला बटर लावून त्यावर बटर पेपर ठेवून परत त्यावर बटर लावा व बाजूला ठेवा.
मैदा, दालचीनी पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ सपेटीच्या चाळणीने चाळून बाजूला ठेवा. मिक्सरच्या भांड्यात अंडी व वाईन ब्लेंड करून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये बटर व साखर मिक्स करून साखर विरघले पर्यन्त मिक्स करून घ्या. मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवा.
बटर व साखर चांगले विरघळल्यावर त्यामध्ये फेटलेले अंडे घालून मिक्स करून मग त्यामध्ये चाळलेला मैदा घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चिरलेले ड्रायफ्रूट घालून परत हलक्या हातांनी मिक्स करून घ्या.
बेकिंग ट्रेमध्ये मिश्रण ओतून टॅप करा. पाहिजे असेलतर वरतून अजून ड्रायफ्रूट घाला. आता बेकिंग ट्रे मायक्रोवेव्ह मध्ये 35 मिनिटसाठी सेट करून केक बेक करायला ठेवा. 35 मिनिट झाल्यावर केक चेक करून पहा झाला आहेकी नाही. झाला असेलर मायक्रोवेव्ह बंद करा व केक तसाच 10-15 मिनिट मायक्रोवेव्ह मध्येच ठेवा. जर टुथपिकला केक चिटकला तर अजून 5-7 मिनिट केक बेक करा.
केक थोडासा थंड झाल्यावर बाहेर काढून ठेवा. आता केक पूर्ण थंड होऊ द्या. मग कट करून सर्व्ह करा.