स्टीम फक्त सर्दी खोकल्यासाठी नाहीतर आपल्या स्कीनसाठी फायदेमंद आहे स्टीम वाफ घेण्याची योग्य पद्धत
देशा मध्ये सध्या महामारीचे संकट चालू आहे. त्यामुळे ह्या संकटापासून वाचण्यासाठी बरेच लोक स्टीम म्हणजेच वाफ घेत आहेत. पण आपल्याला माहिती आहे का स्टीम घेणे हे आपल्या स्कीनसाठी किती फायदेमंद आहे. मग आपण जाणून घेवू या ते कसे?
The Benefits Of Steaming Face And Easy Technique can be seen on our YouTube Advantages Of Steaming Face
स्टीम घेण्याचे खूप फायदे आहेत ते आपल्याला माहिती नसेल. आपण सर्दी खोकला, नाक बंद झाले की स्टीम घेतो. खर म्हणजे स्टीम घेण्याने आपल्या सौन्दर्य मध्ये वाढ होते. आपल्याला माहिती नसेल स्टीम घेण्याचे टेक्निक हे फार पूर्वीच्या काळा पासून चालत आले आहे. ते आपले शरीर साफ करण्यासाठी स्टीम बाथ घेत होते. तसेच चीनमध्ये स्टीम बाथ हे खूप लोकप्रिय आहे.
जर आपल्याला स्कीन च्या काही समस्या असतील व घरगुती किंवा औषध घेऊन सुद्धा ते ठीक होत नसेलतर आपण फेस स्टीम घेऊ शकता त्यामुळे आपल्या चेहऱ्या वरील पिंपल्स निघून जाण्यास मदत होईल.
आपण स्टीम घेण्याचे काय फायदे आहेत ते पाहू या.
1. चेहरा साफ होतो:
स्टीम घेण्यामुळे आपल्या चेहऱ्याची अगदी आत पर्यन्त सफाई होते. आपल्या चेहऱ्या वरील छिद्र बंद होतात जर आपण स्टीम घेतली तर ती बंद छिद्र उघडी होऊन आत पर्यन्त आपली स्कीन स्वच्छ होऊन ब्लॅक हेंडस नरम होतात मग काढण्यास सोपे होते.
2. सर्कुलेशन चांगले होते स्टीम घेण्यामुळे:
वाफ घेण्यामुळे सरकुलेशनला चालना मिळते. गरम गरम वाफ घेण्यामुळे घाम चांगला येतो. व रक्त वाहिन्या फुलून सरकुलेशनला चांगले होते. जेव्हा ब्लड सरकुलेशनला चांगले होते तेव्हा आपल्या स्कीनला ऑक्सिजन चांगला मिळतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. जे आपल्याला कोणते सुद्धा कॉस्मेटिक्स देवू शकत नाही.
3. पिंपल्स तयार करणाऱ्या बैक्टीरियाला दूर करते:
आपणा सर्वाना माहिती असेलच पिंपल्स हे बैक्टीरियाच्या मुळे होतात. म्हणूनच आपण वाफ घेतल्याने त्यापासून बचाव होऊ शकतो व आपली चेहऱ्या वरील छिद्र मोकळी होऊन मृत त्वचा व बैक्टीरिया निघून जातील. छिद्र बंद झाली की पिंपल्स येतात. वाफ घेणे हे ब्युटि ट्रीटमेंटचे काम करते.
4. साइनस कंजेशन मध्ये मदतगार:
स्टीम घेणे हे आपल्या डोके दुखीसाठी सुद्धा चांगले आहे. कारणकी सायनस कंजक्शन मध्ये खूप मदत होते. त्यासाठी आपण काही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. स्टीम घेताना त्या पाण्यात तेल घालावे त्यामुळे चेहरा हाइड्रेट राखण्यास मदत होते.
5. ब्यूटी ट्रीटमेंटसाठी का महत्वाची आहे स्टीम?
सर्वात पहिल्यानदा असे की ही ट्रीटमेंट आपण घरच्या घरी सहजपणे घेऊ शकतो. मार्केटमध्ये बरेच स्टीमर उपलब्ध असतात पण आपण घेऊ शकत नसाल तर आपण एका नॉर्मल भांड्यात पाणी गरम करून स्टीम घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही. आता आपल्याला समजले असेल की स्टीम घेणे का फायदेशीर आहे.
स्टीम घेताना काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे.
आपला चेहरा वाफेची गरमी सहन करू शकतो. पण आपले डोळे सहन करू शकत नाहीत. जेव्हा जेव्हा आपण वाफ घ्याल तेव्हा तेव्हा डोळे बंद करूनच वाफ घ्या.
स्टीम घेताना स्टीमर काही अंतरावर ठेवा.
स्टीम घेताना स्टीमर 6 तो 10 इंच च्या अंतरावर ठेवा. जर आपण घरी भांड्यात स्टीम घेत असाल तर ह्या गोष्टीचे ध्यान ठेवणे जरुरीचे आहे. स्टीमर जर जास्त जवळ ठेवले तर आपला चेहरा भाजू शकतो. कारणकी मग त्याचा त्रास बरेच दिवस सहन करावा लागतो. आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजुक असते.
आता आपण पाहू या स्टीम घेण्याची योग्य पद्धत काय आहे.
1.कोमट पाण्यानि चेहरा धुवा:
स्टीम घेताना आपल्या चेहऱ्यावर खूप घाम येत असतो. मग स्टीम घेवून झाल्यावर चेहरा तसाच ठेवू नये कारणकी आपली चेहऱ्याची स्कीन खूप संवेदनशील असते. स्टीम घेतल्यावर आपण टॉवेलनि अगदी जोर जोरात चेहरा पुसला तर स्कीन खराब होऊ शकते. म्हणून स्टीम घेतल्यावर चेहरा नेहमी कोमट पाण्यानि धुवावा मग हळुवार पणे चेहऱ्यावरील पाणी टिपावे.
2. मॉइश्चराइजर लावा:
कोमट पाण्यानि चेहरा धुतल्यावर क्रीम लावणे चांगले आहे. त्यामुळे स्कीन चांगली सॉफ्ट राहते. किंवा आपण मलई किंवा ग्लिसरीन लाऊ शकता. जर आपण रोज कोणते सुद्धा एंटी एजिंग क्रीम लावत असाल तर स्टीम घेतल्यावर लावणे जास्त फायदेमंद आहे.
3. चेहऱ्यावर करा मसाज:
स्टीम घेतल्यावर चेहऱ्याची छिद्र मोकळी होतात तेव्हा मसाज करणे फायदेशीर आहे. त्यामुळे सरकुलेशन अजून चांगले होते. त्यामुळे चेहऱ्यावर चांगला गलो येतो.