प्रीमिक्स केक | एगलेस प्रीमिक्स केक प्रेशर कुकरमद्धे कसा बनवायचा
केक म्हंटले को तोंडाला पाणी सुटते. आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने केक बनवणार आहोत. ते पण बिना अंडे, बिना बटर व प्रेशर कुकरमध्ये अगदी झटपट.
आपण आज प्रीमिक्स बेसिक केक बनवणार आहोत. प्रीमिक्स म्हणजे सर्व घटक एकत्र करून ठेऊन आपल्याला पाहिजे तेव्हा झटपट केक बनवता येऊ शकतो. प्रीमिक्स केक पावडर आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. व ती घरी आणून आपण लगेच केक सुद्धा बनवू शकतो. पण ती खूप पावडर खूप महाग सुद्धा पडते. जर आपण प्रीमिक्स केक पावडर घरच्या घरी अगदी स्वस्त व मस्त बनवली तर किती छानच होईल.
The Cake Premix | How to Make Vanila Primix Cake At Home can be seen on our YouTube Cake Premix Powder | How to Make Vanila Primix Cake
प्रीमिक्स केक पावडर बनवायला अगदी सोपी आहे तसेच ती पावडर आपण हवबंद डब्यात बरेच दिवस ठेऊ शकतो. प्रीमिक्स बेसिक केक पावडर बनवून ठेवली तर आपल्याला पाहिजे तेव्हा केक बनवता येतो फक्त त्यामध्ये थोडा फार बदल करून पाहिजे त्या फ्लेवरचा केक बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: ½ किलोग्राम केक बनतो.
प्रीमिक्स केक पावडर बनवण्यासाठी
साहीत्य:
1 कप मैदा
½ कप पिठीसाखर
2 टे स्पून मिल्क पाऊडर
1 टी स्पून कॉर्नफलोर
1 टी स्पून बेकिंग पावडर
½ टी स्पून बेकिंग सोडा
1/8 स्पून सायट्रिक अॅसिड
कृती: सर्व साहित्य चाळणीने चाळून हवबंद डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा केक बनवा.
झटपट सोप्या पद्धतीने प्रीमिक्स व्हनीला केक कसा बनवायचा:
प्रीमिक्स पावडर
¼ कप तेल किंवा बटर
½ कप कोमट दूध
¾ टी स्पून व्हनीला एसेन्स
कृती:
प्रथम कुकर गरम करायला ठेवा. कुकर 10 मिनिट तरी गरम झाला पाहिजे. कुकरच्या झाकणाची रिग व शिट्टी काढून ठेवा. कुकरमद्धे 1 कप मीठ घालून त्यावर एक चाकी ठेवा.
ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्याला तेल अथवा बटर लावून त्यावर बटर पेपर ठेवून बटर पेपरला सुद्धा तेल अथवा बटर लावून बाजूला ठेवा.
एका बाउलमध्ये तेल किंवा बटर व दूध घेऊन थोडे फेटून घ्या. मग त्यामध्ये प्रीमिक्स पावडर व व्हनीला एसेन्स घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या. मिश्रण जर घट्ट वाटले तर 1-2 टे स्पून दूध घालून परत मिक्स करा. मिश्रण वरतून टाकले की ते रिबिन सारखे पडले पाहिजे असे पाहिजे. मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एक वेळा हळुवारपणे आपटा.
मग केकचे भांडे कुकरमध्ये 30 मिनिट ठेवा मंद विस्तवावर. 30 मिनिट झाले की विस्तव बंद करून भांडे तसेच पाच मिनिट ठेवा. मग बाहेर काढून थंड झाल्यावर केक कापून सर्व्ह करा.
जर आपल्याला केक ओव्हन मध्ये बनवायचा असेलतर ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहीट करून 35 मिनिट बेक करून घ्या.