चॉकलेट वाटी केक बिना अंडे बिना बटर प्रेशर कुकर मध्ये
चॉकलेट कप केक म्हंटले की लहान मुले असो अथवा मोठी माणसे सर्वांना आवडतो. त्यात परत चॉकलेट केक म्हणजेच विचारायलाच नको. चॉकलेट केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. आपण टी टाइमला किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो.
The Chocolate Cup Cake Without Egg And Butter In Pressure Cooker can be seen on our YouTube Chocolate Cup Cake
चॉकलेट केक बनवताना अंडी वापरली नाही व कुकरमद्धे बनवला आहे. तसेच स्टीलच्या वाटीत बनवला आहे. तसेच बिना बटर अगदी बेकरी सारखा केक घरी बनवता येतो. अगदी सॉफ्ट व चविष्ट केक झटपट बनवता येतो.
चॉकलेट केक आपण मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा इतर दिवशी सुद्धा मुलांच्या पार्टीला बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 ¼ क मैदा
2 टे स्पून कोको पावडर
1 टी स्पून बेकिंग पावडर
¼ टी स्पून बेकिंग सोडा
1 कप दूध
¾ कप साखर
1 टी स्पून व्हेनिगर
½ कप तेल
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
10 छोट्या स्टीलच्या वाट्या केक बनवण्यासाठी
किंवा मध्यम आकाराच्या 6 वाट्या
कृती:
प्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या. स्टीलच्या वाट्याना तेल लावून घ्या. कुकरची शिट्टी व गॅसकेट काढून बाजूला ठेवा. कुकरमद्धे मीठ घालून 10 मिनिट प्रे-हीट करायला ठेवा.
एका बाउल मध्ये दूध, तेल, साखर, व्हनिगर, व्हनीला एसेन्स घालून साखर विरघले पर्यन्त एग बिटरनि बीट करून घ्या. साखर विरघळली की त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिक्स करून केकचे बॅटर बनवून घ्या. मग बनवलेले केकचे बॅटर प्रतेक वाटी मध्ये ¾ वाटी भरा. मग सगळ्या वाट्यामध्ये बॅटर घालून सर्व वाट्या कुकरमद्धे ठेवा व झाकण लावून मंद विस्तवावर 30 मिनिट केक बेक करून घ्या.
केक 30 मिनिट बेक झाल्यावर विस्तव बंद करून 5-7 मिनिट केक तसाच ठेवा मग बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.