आंबट गोड कोंकणी पद्धतीने मटकीची उसळ
मटकीची उसळ लहान मुळे असो अथवा मोठी माणसे असो सर्वाना आवडते. आपण मटकीची उसळ वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. मटकीची आंबट गोड मसाला उसळ खूप छान टेस्टी लागते. मुले अगदी आवडीने खातात. कोंकणी पद्धतीने म्हणजे चिंच गूळ घालून छान लागते.
The Kokani Style Ambat god Matkichi Usual For Kids can be seen on our YouTube Matki Moot Usual
मटकीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मटकी हे सुपर फूड मानले जाते. मटकीच्या सेवनाने आपली हाडे मजबूत बनतात. मटकीच्या सेवनाने आपले स्नायू मजबूत बनतात. त्याच बरोबर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मटकी मध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नीज, लोह, कॉपर, सोडिअम आणि झिंक अश्या प्रकारचे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे.
मटकीची आंबट गोड उसळ आपण चपाती, भाकरी किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप मोड आलेली मटकी
1 टे स्पून शेगदाणे
1 टे स्पून चिंचेचा कोळ
1 टे स्पून गूळ
मीठ चवीने
2 टे स्पून ओले खोबरे (खोवून)
2 टे स्पून कोथिंबीर
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
4-5 लसूण पाकळ्या (ठेचून)
¼ टी सपूज मेथी दाणे
¼ टी स्पून धने
7-8 कडीपत्ता पाने
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
¼ टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 ½ टी स्पून गोंडा मसाला
कृती: प्रथम मटकीला मोड आणून घ्या. किंवा बाजारात आपल्याला मोड आलेली मटकी सहज उपलब्ध होते. कांदा बारीक चिरून घ्या. लसूण सोलून ठेचून घ्या. नारळ खोवून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
प्रथम एका भांड्यात मटकी, शेंगदाणे अगदी एक चिमूट मीठ व ½ कप पाणी घालून कुकरमद्धे दोन शिट्या काढून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, मेथी दाणे, धने, कडीपत्ता व लसूण घालून मग चिरलेला कांदा घाऊन 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घालून शिजवलेली मटकी व मीठ चवीने घालून ½ कप पाणी घालून मिक्स करून घ्या.
मटकीला चांगली उकळी आली की चिंचेचा कोळ व गूळ घालून मिक्स करून परत 2 मिनिट मटकी शिजू द्या मग त्यामध्ये कोथिंबीर व ओला नारळ घालून हलवून घ्या.
गरमा गरम मटकीची आंबट गोड उसळ चपाती बरोबर सर्व्ह करा.