मकर संक्रांति 14 जानेवारी 2022 शुभ मुहूर्त, तिथी, पूजाविधी, बोरनहाण,महत्व व तिळाचे नानाविध पदार्थ
मकर संक्रांति हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे. हा सण हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून शुभ व मंगल कामे सुरू होतात. कारण ह्या दिवसापासून खारमासची समाप्ती होते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात. काही ठिकाणी खिचडी ह्या नावावे सुद्धा प्रसिद्ध आहे. ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात. व दानधर्म करतात. ह्यादिवशी काळे तीळला जास्त महत्व आहे. तसेच काळे तीळ दान करण्याची पद्धत आहे.
The Makar Sankranti 2022 Shubh Muhurth, Tithi, Mahatwa and Tilachya Recipes can be seen on our YouTube Makar Sankranti 14 January 2022
‘मकर संक्रांति’ शुभ मुहूर्त:
मकर संक्रांति : 14 जानेवारी 2022 पुण्य काल- 14 जानेवारी दुपारी 02.43 पासून संध्याकाळी 05.45 पुण्य काल: 03 तास 02 मिनट
मकर संक्रांति महा पुण्यकाल- 14 जानेवारी दुपारी 02.43 पासून 04:28 पर्यन्त कालावधी 01 तास 45 मिनट
14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी , तिळाची भाकरी व खिचडी बनवतात.
15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे.ह्या दिवशी तीळचे गोड पदार्थ बनवतात व तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.
16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे. म्हणजेच करी दिन आहे. ह्या दिवशी सांगले कोणते काम करीत नाही.
मकरसंक्रांति महत्व:
मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्या बरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. ह्या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते.
भारतात मकर संक्रांत प्रतेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केला जाते. महाराष्टात मकर संक्रांत, केरला मध्ये पोंगल, पंजाबमध्ये माघी व गुजरात मध्ये उतरायण व उतराखंडमध्ये उतरायणी इ.
मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून काळ्या रंगाची जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी , घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पूजा झाल्यावर तीळ गुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नेवेद्य दाखवतात.
महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. प्र्तेक घरातील महिला आपले घर स्वच्छ करून आवरून सजवून घेतात. ह्या दिवशी महिला छान आवरून घरात देवाची यथासांग पुजा करतात. पुजा झाल्यावर 5 बोळक्यांची पुजा केली जाते. व ती पूजा केलेली बोळकी (सुगड) संवाष्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते.
मकरसंक्रांतिला बोळक्यांची (सुगड) पूजा कशी करायची
साहीत्य:
चौरंग व त्यावर स्वच्छ कापड
नवीन कापड बोळक्यांना झाकायला
पूजेचे सामान व फुले
5 मातीची बोकळी
1 पणती
दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी
बोळक्यांनमध्ये भरण्या साठी:
1 छोटे गाजर (चिरून)
10-15 पावटा शेगा
10-12 ताजी बोरे
1 छोटा उस तुकडे करून
5 भाताच्या ओंब्या
तीळ गूळ
नवीन कापड बोळक्यांना झाकायला
पुजा विधी:
प्रथम एका चौरंगवर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी. प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकु लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे, पावटा शेगा, बोरे, ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तीळ गूळ घालावे. मग एका बोळक्यावर पणती ठेवून त्यावर फूल ठेवावे वरतून कापड घालावे.
मग पुजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो कोणाची सुद्धा नजर न लागो.
पुजा केल्यावर महिला देवळात जावून दुसर्या संवाष्ण महिलेला वाण देतात. संध्याकाळी घरी संवाष्ण महिलांना हळद कुंकू साठी बोलवतात. हळद कुंकू हे रथसपत्मी पर्यन्त करतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र घालतात त्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही किंवा कोणत्यापण नकारात्मक शक्तीचा परीणाम आपल्यावर होत नाही.
नवी नवरी हळदी कुकु:
मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुकु करतात तीला हलव्याचे दागीने घालून तेचे कौतुक करतात पहीले हळदी कुकु करतात. काळ्या रंगाची साडी भेट देतात.
लहान मुलांचे बोरन्हाण:
लहान मुलांचे बोर नहाण करतात म्हणजे लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागीने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चूरमुरे, साखर फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटे, चॉक्लेट, ऊस, बोरे, हरभरे, मिक्स करून ज्याचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात. व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात. बोरन्हाण हे 5 वर्षा वयाच्या मुलांचे करतता.
ऐतिहासिक महत्व:
मकरसंक्रांति ह्या दिवशी सूर्य देव आपले पुत्र शनि ह्यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांति असे म्हणतात. ह्याच दिवशी भीष्म पितामह ह्यांनी आपला देह त्याग केला होता, ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात. तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होत जाते.
मकर संक्रांति ह्या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण जप, तप ह्याचे जास्त महत्व असते.
तीळचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या, गजक, रेवडी, गुळाची पोळी व तिळाची चटणी ह्या आगोदरच्या विडियोमध्ये प्र्काशीत केले आहे.
तिळाच्या वड्या लाडू कसे बनवायचे त्याची लिंक येथे पहा:
Til Gulachi Poli Recipe in Marathi
Tilache Aushdhi Gundharm In Marathi
Tilachi Chutney Recipe in Marathi
Tilachi Burfi Recipe in Marathi
Konkani Style Tilachi Vadi for Makar Sankranti Recipe in Marathi
Sankranti Tilachi Vadi Recipe in Marathi
Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi
Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi
Maharashtrian Til Honey Ladoo for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Khajur Laddu for Makar Sankranti Recipe in Marathi
Til Gulachi Poli Recipe in Marathi
Bajra Til Bhakri Recipe in Marathi
Chocolate Sesame Ladoos
Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
Tilgulache Laddu Recipe in Marathi