नाचनी | रागी | फिंगर मिलेट सेवनाचे गुणकारी फायदे
नाचणी ही एक सर्वात पोषक धान्य आहे. आपण गहू, ज्वारी, बाजरी, मका सेवन करतो. पण खेड्या पाड्यात किंवा पहाडी किंवा आदिवासी लोक नाचणी म्हणजेच रागीचे जास्त सेवन करतात. तसेच त्यांचे मुख्य भोजन सुद्धा तेच आहे.
The Nachni Ragi Finger Millet Health Benefits Fayde can be seen on our YouTube Nachni Ragi Finger Millet Health advantage and disadvantage
आता सध्या जंक फूड सेवन करण्याची प्रथा किंवा सवय लागली आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, शरीराचे वजन वाढते, डायबीटीस ,
अपचन, लहान मुलांमध्ये कुपोषण, विटामीन डेफीशियनसी, एनिमिया ह्या सारख्या समस्याना तोंड द्यावे लागते. नाचणीमध्ये एमिनो एसिड, एंटी-ऑक्सीडेंट्स व फाइबरचे गुण आहेत.
आयुर्वेदानुसार नाचणी शरीर शांत ठेवते तसेच त्याच्या सेवनाने शरीराचे वजन नियंत्रणात राहते व पचायला हलकी असून पौष्टिक असून सगळ्या धान्यामद्धे उत्तम आहे. नाचणी ही गरिबांसाठी मांसाहारी जेवणासारखी आहे. त्यामध्ये प्रोटिन भरपूर प्रमाणात आहे.
नाचणी ही पित्तशामक व डोके शांत ठेवते. स्मरणशक्ती वाढवते. नाचणी ही दुधा बरोबर सेवन केल्यास फायदेशीर आहे. नाचणी ब्रेन टॉनिकचे काम करते. आपण बाजारातून हेल्थ फूड सप्लिमेंट आणतो त्याच्या आयवजी नाचणीचे सेवन करावे.
नाचणी किंवा रागी सेवनाचे फायदे:
1. हाडांसाठी फायदेमंद:
नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हाडांचे आजार रोकण्यासाठी व त्यांचा चांगला विकास होण्यासाठी नाचणीचे सेवन केले पाहिजे. आपण बाजारातील महागडी औषध किंवा वापरतो त्याच्या आयवजी मुलांना रागीची खीर बनवून ध्या. ती जास्त प्रभावी होईल.
2. शरीराचे वजन कमी करण्यासाठी:
नाचणी च्या सेवनाने वजन कमी रखण्यास मदत होते. नाचणीचे सेवन केल्याने भूक कमी लागते व आपल्या शरीराला लागणारे पोषक गुण त्याच्यामध्ये आहेत. म्हणून सकाळच्या वेळी नाचणी सेवन केली तर ती जास्त फायदेमंद होते.
3. नाचणीमध्ये फाईबर जास्त प्रमाणात आहे:
तांदळापेक्षा नाचणीमध्ये फाईबर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ती पचनास हलकी आहे, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे लिवरचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल योग्य राहते.
4. मधुमेहीसाठी फायदेमंद:
नाचणीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहते. म्हणून आहारात रोज सकाळी नाचणी सेवन करा पूर्ण दिवस आपले शरीर योग्य ते काम करील, म्हणजेच शरीराची सिस्टिम योग्य राहित.
5. एनिमियासाठी फायदेमंद:
नाचणीमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे. ज्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले आहे. त्यांनी नाचणीचे सेवन नियमित करावे. म्हणजे हा घरगुती उपाय करावा. आपण नाचणीची खीर, लाडू, भाकरी बनवून सेवन करू शकता.
6. हाय ब्लड प्रेशरसाठी फायदेमंद:
नाचणीच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून कोलेस्ट्रॉल पण नियंत्रणात राहते. रक्त वाहिन्या मधील अडथळा दूर होतो.
7. लहान मुलांसाठी फायदेमंद:
दक्षिण भारतात ह्याचे अधिक प्रमाण आहे. तेथे नवजात शिशु 28 दिवसाचा झाला की नामकरणच्या दिवशी नाचणीची खीर चाखवतात. त्याच्या मुळे बाळाची पचनशक्ति चांगली वाढते. कॅल्शियम लोह मिळलेकी बाळाची प्रकृती चांगली राहते.
8. बाळंतिनिला नाचणी फायदेमंद:
बाळंत झाल्यावर बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलानी नाचणीचे जरूर सेवन करावे. कारण त्यामुळे दुधामद्धे वाढ होते व त्यामध्ये एमिनो असिड, लोह, कॅल्शियम वाढते. ते बाळाला फायदेमंद आहे.
9. नाचणी त्वचेसाठी फायदेमंद:
नाचणीमध्ये मेथियोनिन व लाईसीन सारखे महत्वाचे एमिनो असिड आहे. त्याच्या मुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. तसेच त्यामध्ये विटामीन डी आहे.
नाचणी सेवनाचे तोटे:
नाचणीचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही नुकसान सुद्धा आहेत म्हणूनच ते प्रमाणाच्या बाहेर सेवन करू नये.
किडनी: ज्याना किडनीचा त्रास आहे त्यांनी नाचणीचे सेवन करू नये. त्यामुळे त्यांना अजून नुकसान होऊ शकते.
थायरॉयड: थायरॉयडकहा त्रास असणाऱ्यानी रागीचे सेवन करू नये.
डायरिया: ज्यांना डायरियाचा त्रास होत असेल त्यांनी नाचणीचे सेवन करू नये.