पौष पूर्णिमा 2022 कधी लक्ष्मी माताची पूजा करून धन आकर्षित करा
पौष पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्यास धन वर्षा होते ते कसे ते आपण जाणून घेऊ या.
पौष महिना हा मराठी कॅलेंडर प्रमाणे 10 वा महिना आहे. पौष महिना संपला की माघ महिना चालू होतो. पूर्णिमा ह्या दिवशी पूर्ण चंद्राचे दर्शन होते. प्राचीन काळापासून पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र देवाची पूजा करण्याची पद्धत आहे.
The Paush Purnima 2022 Worship Goddess Lakshmi Mata can be seen on our YouTube Paush Purnima 2022 Worship Goddess Lakshmi Mata
पौष महिन्यातील शुक्ल पक्ष खूप खास मानला जातो. ह्या काळात दान धर्म करावा तसेच ह्या काळात घरात कोणती नवीन वस्तु आणली तर वर्ष चांगले जाते. तसेच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळात माता लक्ष्मीची मूर्ती आणून पूजा करून घरात प्रतिष्ठापना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर राहते. आपल्याला पैशांची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
पौष महिन्याची पूर्णिमा 17 जानेवारी 2022 सोमवार ह्या दिवशी आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्णिमाचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी स्नान-ध्यान, पूजा, जप-तप व दान धर्म करतात. तसेच ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये डुबकी मारणे शुभ मानले जाते.
पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने सुख समृद्धी व शांती मिळते. ह्या दिवशी काही सोपे व सहज उपाय केले तर घरात धनाचे आकर्षण होते असे म्हणतात.
पौष पूर्णिमा मुहूर्त:
पौष पूर्णिमा 17 जानेवारी 2022 पहाटे 3 वाजून 18 मिनिट सुरवात
18 जानेवारी 2022 सकाळी 5 वाजून 17 मिनिट पर्यन्त
पौष पूर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय:
पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावणे शुभ मानले जाते. ह्या दिवशी मुख्य दरवाजा बरोबर घरातील बाकीच्या दरवाजावर आंब्याची डहाळी किंवा अशोक ह्या वृक्षाच्या पानाचे तोरण लावणे शुभ मानले जाते. तसेच ह्या दिवशी मेन दरवाजावर स्वस्तिक काढावे अश्याने लक्ष्मी माताचे घरात आगमन होते.
प्राचीन ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की पूर्णिमा ह्या दिवशी दान केले तर अश्वमेघ यज्ञ केल्याची फल प्राप्ती होते. म्हणूनच ह्या दिवशी जेव्हडे शक्य म्हणजे आपल्या आयपती प्रमाणे दान करावे जरूरत मंद किंवा गरीब व्यक्तिला दान दिल्याने पुण्य मिळून धनाचे आकर्षण होते.
माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी ह्या दिवशी स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून 11 कौड्या लक्ष्मी माताला अर्पण कराव्या व धन प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. मग माता लक्षीला हळदीचा टिळा लावावा. मग दुसऱ्या दिवशी कवड्या एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरी किंवा आपण जेथे धन ठेवतो तेथे ठेवाव्या म्हणजे धनाचे आकर्षण होते असे म्हणतात.
पूर्णिमा ह्या दिवशी मंदिरामध्ये लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, व व्यापार यंत्र जरूर स्थापित करा. लक्ष्मी माताची विधीपूर्वक पूजा झाल्यावर गुलाबी रंगाचे फूल अर्पित करा. कारण लक्ष्मी माताला गुलाबी रंग अतिप्रिय आहे.