तिळकुट संकट चतुर्थी व्रत महत्व पूजा विधि नियम व कथा
श्री गणेश भगवान ची पूजा अर्चा केल्यास आपल्या जीवनात सुख शांती व आशीर्वाद मिळतात. आपण जाणून घेऊ या ह्या दिवसाचे महत्व व संकट हरण करणारी संकष्टी चतुर्थी चे महत्व काय आहे.
The Sankashti Chaturthi 2022 Vrat Mahatva Puja Vidhi Niyam And Katha can be seen on our YouTube Sankashti Chaturthi 21st January 2022
हिंदू कॅलेंडर नुसार दर महिन्यात कृष्ण पक्षच्या चौथ्या तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी करतात. ह्या दिवशी श्री गणेश भगवान ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करतात. दरवर्षी 12 चतुर्थी येतात पण अधिक महिना आला की 13 चतुर्थी येतात.
संकष्टी चतुर्थी 21 जानेवारी 2022 शुक्रवार ह्या दिवशी असून चंद्रोदय रात्री 9 वाजून 21 मिनिट नंतर आहे. पण चंद्रोदय हा प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेळेस असतो त्यानुसार व्रत सोडावे.
21 जानेवारी 2022 शुक्रवार ह्यादिवशी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे. ह्या दिवसाला तिळकुट चतुर्थी सुद्धा म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी माता पार्वतीनि निर्जल व्रतचे अनुष्ठान आपले पुत्र गणपतीच्या मंगळ कामना साठी केले होते. तेव्हा पासून हिंदू धर्मातील महिला संकष्टी चतुर्थीचे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या मुलांचे आयुष सुखी जावे म्हणून करतात. म्हणून ह्यादिवशी माता पार्वती व गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा करून उपवास करतात. विघ्नहर्ता गणेश भगवान ह्यांची पाणी, अक्षता, दूर्वा, लड्डू, पान सुपारी नि विधी पूर्वक पूजा करून आराधना करण्याची परंपरा आहे.
संकष्टी चतुर्थी महत्व:
संस्कृत भाषेमध्ये संकष्टी ह्याचा अर्थ संकट म्हणजेच बाधा निवारण करणारा असा होतो. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे महत्व आहे. म्हणूनच ह्यादिवशी गणेश भगवानची पूजा केल्याने सर्व दुखांचा नाश होतो. गणेशजीना प्रसन्न करण्याचा हा दिवस चांगला शुभ आहे.जर आपल्यावर काही संकट आले असेलतर ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा केली तर संकट निवारण होते.
संकष्टी चतुर्थी पूजा विधि:
आपण सुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असाल तर त्याची पूजाविधी जाणून घ्या. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करावा. मग गणेश भगवान ह्यांची पूजा करावी. त्यांना अभिषेक करावा. धूप दीप प्रज्वलित करावा. दूर्वा, लाल रंगाचे फूल अर्पण करावे. असे म्हणतात की गणशजी ना लाल रंगाचे फूल अतिप्रिय आहे ते अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. मग गणेश भगवान ह्यांना लाडू किंवा त्यांचे आवडतीचे मोदक ह्याचा नेवेद्य दाखवावा. मोतीचूरचे लाडू गणेशजिना खूप प्रिय आहेत. ह्या चतुर्थीला तीलकूट चतुर्थी सुद्धा म्हणतात तर तिळाचे लाडू नेवेद्य म्हणून दाखवावे. ह्या दिवशी ब्रह्मचर्यचे पालन करावे व सात्विक भोजन करावे. ह्या दिवशी शांत रहावे क्रोध करू नये. किंवा अपशब्द वापरू नये. पूर्ण दिवस उपवास करून रात्री आरती करून मग नेवेद्य दाखवून उपवास सोडावा. पूजा अर्चा झाल्यावर ॐ गण गणपतेय नम: किंवा ॐ गणेशाय नम: हा मंत्र जाप करावा.
संकष्टी चतुर्थी कथा:
हिंदू धर्म नुसार ह्या महिन्यातील चतुर्थीचे विशेष महत्व आहे. त्याच्या मागे एक पौराणिक कथा विघ्नहर्ता गणेशजी ह्यांच्या समबधित आहे. ह्या दिवशी श्री गणेशजी ह्यांच्या वर आलेले खूप मोठे संकट टळले होते. म्हणून ह्यादिवसाला संकट चतुर्थी म्हणतात. ह्या कहाणी नुसार एक दिवस माता पार्वती स्नान करण्यासाठी गेली असता तिने आपले पुत्र गणेश ह्याला दारा बाहेर पहारा देण्यास सांगितले व ती स्नान करण्यास आत गेली. गणेशजी बाहेर पहारा देत असताना तेव्हडयात भगवान शंकर माता पार्वती हयना भेटण्यास आले. तेव्हा गणेशजिनि त्याना अडवले तर शंकर भगवान खूप क्रोधित झाले व त्यांनी गणेशजीनचे त्रिशूलनि मुडके धडापासून कापले. माता पार्वतीला बाहेरील आवाज आइकू आला व ती धावत बाहेर आली व ते दृश पाहून ती खूप घाबरली. मग शंकर भगवान ची विनवणी करू लागली की गणेशजीना जीवदान द्या. माता पार्वतीची विनवणी आइकून शंकर भगवान ह्यांनी गणेश जिना जीवदान दिले पण त्यांना हत्तीच्या लहान मुलाचे तोंड लावले. म्हणूनच महिला ह्या दिवशी आपल्या मुलांच्या सलामतीसाठी व्रत करतात.