टेस्टी मेथी बटाटा भाजी मुलांच्या डब्यासाठी
मेथी मध्ये बरेच प्रकारचे पॉलीफेनॉल्स आहेत. जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. त्याच बरोबर शरीरावर फॅट जमा न होण्यास मदत होते. मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फासफोरस, एंटी-इंफ्लेमेटरी व एंटी-ऑक्सीडेंट सारखे गुण आहेत.
The Tasty Methi-Batata Bhaji For Kids can be seen on our YouTube Tasty Methi-Batata Bhaji For Kids
मेथीची भाजी खाण्यास मुळे कंटाळा करतात. मग आपण त्यामध्ये बटाटा घालून भाजी बनवली तर छान टेस्टी लागते. मेथी बटाटा भाजी टेस्टी लागते. आपण भाकरी, चपाती किंवा फुलके बरोबर सर्व्ह करू शकतो.
मेथी बटाटा भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. अश्या प्रकारची भाजी मुले अगदी आवडीने खातात किंवा त्यांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 कप मेथी (धुवून चिरून)
1 मध्यम आकाराचा बटाटा
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 चमचा तेल
½ टी स्पून मोहरी
½ टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
4-5 लसूण पाकळ्या (ठेचून)
कृती: प्रथम मेथी धुवून चिरून घ्या. बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून धुवून घ्या. लसूण सोलून ठेचून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लसूण व चिरलेले बटाटे घालून 5 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. म्हणजे ते छान खमंग लागतील.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून मिक्स करून चिरलेली मेथी घालून मंद विस्तवावर भाजी शिजू ध्या. कढईवर झाकण ठेवून भाजी मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम मेथी बटाटा भाजी चपाती, भाकरी किंवा फुलका बरोबर सर्व्ह करा.