इलायची वेलची सेवनाचे औषधी फायदे वाचून हैरान व्हाल
आपल्याला वेलची म्हणजेच इलायची परिचयाची आहे. आपण त्याची पावडर बनवून गोड पदार्थ बनवतो त्यामुळे त्या पदार्थला छान स्वाद येतो व त्याची टेस्ट सुद्धा बदलते. किंवा आपण मसाले बनवताना सुद्धा इलायचीचा वापर करतो.
वेलचीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. आपण स्वयंपाक करताना वेलची वापरतो पण आपल्याला त्याचे काय फायदे आहेत ते माहीत नसते.
आपण कोणता सुद्धा पदार्थ जास्त सेवन केल्यास त्याचे काही तोटे सुद्धा असतात म्हणूनच कोणते सुद्धा पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नयेत. म्हणूनच दिवस भरतून फक्त 2-3 वेलची सेवन करावी त्याच्या पेक्षा जास्त सेवन करू नये.
The Wonderful Health Benefits Of Cardamom can be seen on our YouTube Health Benefits Of Cardamom
वेलची सेवन करण्याचे आरोग्यदाई फायदे:
बरेच वेळा असे दिसून येते की लोक इलायचीचा स्वाद चांगला आहे म्हणून जास्ती सेवन करतात पण ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह नाही. आता आपण पाहू या त्याच्या सेवनाने होणारे फायदे काय आहेत.
1. बीपी नॉर्मल राहते:
आज कालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांची बीपी संबंधीत तक्रारी वाढल्या आहेत. त्यासाठी वेलचीचे सेवन करणे फायदेशीर आहे. इलायचीमध्ये पोटेशियम, कैल्शियम, मैग्नेशियम सारखे खनिज पदार्थ आहेत. आपल्या शरीरातील रक्तात प्रमुख तत्व म्हणजे पोटेशियम आहे इलायची मध्ये ते भरपूर प्रमाणात आहे.
2. छातीच्या समस्या पासून बचाव होतो:
वेलची सेवनामुळे रकतभिसरण वेगाने होते. त्यामुळे श्वसन संबंधित विकार अस्थमा किंवा सर्दी खोकला पासून आराम मिळतो. आयुर्वेदामध्ये वेलची ही गरम मानली जाते. त्यामुळे शरीरात गरमी तयार होते.
3. ब्लड प्रेशर नियंत्रित राहते:
वेलचीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मानवी शरीरामध्ये जास्ती करून आजारपण हे ब्लड प्रेशरमुळे येतात. जर आपण रोज दिवसामधून 2-3 वेलची सेवन केल्यातर जीवनभर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही.
4. तोंडाच्या वासापासून मुक्ती मिळते:
वेलची ही जेवणातील स्वाद बरोबर माऊथ फ्रेशनरचे सुद्धा काम करते. जर आपल्या मुखचा दुर्गंध येत असेलतर लोक आपल्या पासून लांब पळतील किंवा आपल्याशी बोलायला संकोच करतील. तेव्हा आपण आपल्या मुखात एक इलायची ठेऊ शकता.
5. वैवाहिक जीवन सुखी होते:
आपल्याला माहीत नसेल की वेलची सेवन केल्याने आपल्या विवाहिक जीवनात सेक्स लाईफ चांगले होते. रोज 2-3 वेलची सेवन केल्याने आपला पार्टनर पण खुश राहतो. त्यामुळे नपुंसकता असेलतर फायदा होतो.
6. उल्टीची समस्या असेलतर त्यामुळे आराम मिळतो:
आपल्याला प्रवासात जाताना काही अंतरावर गेल्यावर उल्टीची समस्या होत असेलतर प्रवासाला जाण्याच्या अगोदर वेलची सेवन करा. किंवा पूर्ण प्रवासात वेलची तोंडात ठेवा.
7. घशातील खवखव दूर करते:
जर वातावरणात बदल झाला किंवा सीझन बदलला की घशात खवखव होत असेलतर वेलचीचे सेवन केल्याने घशातील खवखव कमी होते. त्यामुळे घसा दुखी सुद्धा कमी होते.
8. शरीरातील विषारी पदार्था पासून छुटकारा:
वेलचीचे सेवन शरीरामधील विषारी पदार्थ दूर करण्यास मदत करते. बरेच वेळा असे होते की आपल्या शरीरात विषारी पदार्थ असतात त्यामुळे आपली तबेत खराब होते. पण जर आपण रोज वेलचीचे सेवन करू शकत नसाळतर आठोडयातुन 2-3 वेळा तरी सेवन करावे.
9. एसिडिटी पासून आराम मिळतो:
आपल्याला माहीत आहे का इलायचीमध्ये तेलाचा औंश असतो व इलायचीचे सेवन केल्याने पोटातील लायनिग मजबूत करते. एसिडिटीच्या समस्यामध्ये पोटात एसिड जमा होते. वेलचीच्या सेवनाने ते हळू हळू कमी होते.