दुधी भोपळा सेवनाचे 10 आरोग्यदाई फायदे
दुधी भोपळा ही एक हिरवी फळभाजी आहे. तो आरोग्यासाठी फायदेमंद आहे. खासकरून गरमीच्या सीझनमध्ये होय. भारतामध्ये दुधी भोपळा जास्त प्रमाणात सेवन केला जातो. दुधी भोपळा वापरुन बरेच पदार्थ बनवले जातात. म्हणजेच दुधीचा हलवा, दुधीची भाजी, दुधीचा पराठा किंवा दुधीची कोफत्ता करी किंवा दुधीचे थालीपीठ. काही लोक दुधीचा ज्यूस करून सुद्धा सेवन करतात. दुधीचा ज्यूस खूप गुणकारी आहे. पण जास्ती करून दुधीची भाजीच बनवली जाते. दुधी मध्ये असे काही गुण आहेत ते आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर ठेवते.
The Bottle Gourd Health Benefits can be seen on our YouTube Dudhi Bhopla Lauki Fayde | Bottle Gourd Health Benefits
दुधी भोपळा ही अशी फळ भाजी आहे ती बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. तसेच बाराही महीने ती मिळते. पण दुधी भोपळा हा नेहमी ताजा हिरवा गार असा सेवन करावा त्यामुळे त्याचा फायदा जास्त प्रमाणात होतो. दुधी भोपळा ही फळभजी अशी आहे की तीचा प्रतेक भाग आपण वापरुन त्याचा पदार्थ बनवू शकतो. दुधी भोपळ्याची साल ही आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत त्याची आपण चटणी बनवू शकतो. तसेच दुधीच्या बियाचा पण चांगला उपयोग करू शकतो.
दुधी भोपळ्याच्या सेवनाने आपल्याला शरीरात शक्ति येते. त्यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, आयरन व सोडियम आहे. दुधीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या रक्तातील हीमोग्लोबिनची कमी पूर्ण करते. तसेच आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
Benefits Of Bottle Gourd: दुधी भोपळा सेवनाचे 10 अद्भुत फायदे:
1. वजन कमी करण्यास फायदेमंद: शरीराचे वजन कमी करण्यास दुधी खूप फायदेमंद आहे. जरी आपल्याला आवडत नसला तरी पण दुधीचे सेवन करा. त्याच्या ज्यूसने किंवा वाफवून सेवन केल्याने लवकर शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.
2. कोलेस्ट्रॉलः दुधीचे सेवन केल्याने हार्ट संबंधित तक्रारी कमी होतात. त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल जे आपल्याला हानिकारक आहे ते कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल वाढलेकी हार्ट संबंधित तक्रारी वाढतात तर दुधीचे नियमित सेवन करा.
3. हाडांचे आरोग्य: दुधीमध्ये कैल्शियम, मैग्नीशियम व जिंक हे गुण आहेत. जे हाडांना मजबूत ठेवते. म्हणून दुधीची भाजी किंवा ज्यूस नियमित सेवन करा.
4. डायबिटीजः डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेमंद आहे दुधी भोपळा. दुधीमध्ये बरेच काही तत्व आहेत जे डायबीटीज सारख्या समस्यान पासून दूर ठेवते.
5. गर्भावस्थाः गर्भावस्थामध्ये दुधी भोपळ्याचा ज्यूस सेवन करणे फायदेशीर आहे. दुधीच्या सेवनाने गर्भाशय मजबूत राहते व गर्भस्त्रावच्या समस्यापासून दूर ठवले जाते.
6. उलटी: दुधी भोपळा दहीमध्ये मिक्स करून सेवन केल्यास उलटीच्या समस्या पासून आराम मिळतो. उलटी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अश्या वेळी दुधीचे सेवन केल्याने शरीरातील पाणीची पातळी योग्य राहण्यास मदत मिळते.
7. एनर्जीः दुधीचा ज्यूस सेवन केल्याने शरीर ताजेतवाने होते. दुधी सेवन केल्याने पोट जड होत नाही. जर आपल्याला नियमित ताजे तवाने रहायचे असेलतर दुधीभोपळ्याचे नियमित सेवन करा.
8. स्ट्रेसः दुधी सेवन केल्याने स्ट्रेस कमी होतो. दुधी आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. त्याच्या मध्ये सेडेटिव प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या मुळे शरीर रिलेक्स राहते व स्ट्रेसच्या समस्या पासून दूर राहता येते.
9. डाइजेशनः दुधी मध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे पोटाच्या समस्या पासून आराम मिळतो. तसेच त्याच बरोबर दुधी च्या सेवनाने एसिडिटी च्या समस्या पासून दूर राहता येते.
10. स्किनः दुधीचे ज्यूस सेवन केल्याने आपली स्कीन हेल्दी राहते. ते शरीरातील खराब पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यांच्या मुळे शरीराच्या स्कीन ग्लोइंग बनते.