पौष्टिक दुधी भोपळा पराठे लौकी पराठा मुलांसाठी
दुधी भोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किनी हितावह आहे ते आपण ह्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये पहिले आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात. पण आईला वाटते की मुलांनी भाजी खाल्लीच पाहिजे. त्यासाठी अश्या प्रकारचे भाजी वापरुन आपण पराठे बनवून देवू शकतो.
The Dudhi Bhopla Paratha | Lauki Ka Paratha | Bottle Gourd Paratha can be seen on our YouTube Dudhi Bhopla Paratha | Lauki Ka Paratha | Bottle Gourd Paratha
लौकि पराठा म्हणजेच दुधी भोपळाचा पराठा पौष्टिक आहे. तसेच बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मुलांना शाळेत जाताना डब्यात द्यायला छान आहे तसेच आपण नाश्ता साठी किंवा जेवनांत सुद्धा अश्या प्रकारचे पराठे बनवू शकतो.
दुधी भोपळ्याच्या सेवनाने आपल्याला शरीरात शक्ति येते. त्यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, आयरन व सोडियम आहे. दुधीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या रक्तातील हीमोग्लोबिनची कमी पूर्ण करते. तसेच आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6 पराठे बनतात
साहीत्य:
1 कप दुधी भोपळा (कीस)
2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून बेसन
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
तेल पराठे भाजण्यासाठी
तूप वरतून लावण्यासाठी
कृती: प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून सोलून, किसून घ्या. आल=लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, भोपळ्याचा कीस, बेसन, लाल मिरची पाऊडर, हळद, धने-जिरे पावडर, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, मीठ घालून मिक्स करून पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घ्या. मग 1 टे स्पून तेल घालून परत गोळा चांगला मळून 5 मिनिट बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. पोळपाटावर एक गोळा पीठ लावून लाटून घ्या. तवा गरम करून पराठा थोडेसे तेल घालून छान खमंग भाजून घ्या.
जर आपल्याला घडीचा चौकोनी पराठा बनवायचा असेलतर एक पिठाचा गोळा घेऊन पुरी पेक्षा थोडासा मोठा लाटून त्यावर थोडेसे तेल लाऊन त्याची मुडपून चौकोनी घडी करून घ्या. मग चौकोनी पराठा लाटून घ्या. पराठा लाटून झाल्यावर तेलावर छान खमंग भाजून घ्या.
गरम गरम पराठे टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर सर्व्ह करा.