10 मिनिटांत परफेक्ट बॉम्बे हलवा | कराची हलवा | कॉर्नफलोर हलवा
बॉम्बे हलवा ही एक छान स्वीट डिश आहे. आपण कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा इतर वेळी सुद्धा सणवार च्या दिवशी स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. बॉम्बे हलवा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. कराची हलवा छान टेस्टी लागतो व दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो.
The Bombay Halwa | Karachi Halwa | Corn flour Halwa in 10 Minutes can be seen on our YouTube Bombay Halwa | Karachi Halwa | Corn flour Halwa
बॉम्बे हलवा बनवताना कॉर्न फलोर किंवा आरारूट, साखर, तूप व ड्रायफ्रूट वापरले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 20 वड्या बनतात
साहीत्य:
1 कप कॉर्न फलोर किंवा आरारूट
2 कप साखर
3 टे स्पून तूप
½ टी स्पून वेलची पावडर
½ कप काजू, बदाम, पिस्ता
1 चिमूट लाल खाण्याचा रंग
¼ टी स्पून लिंबुरस
कृती:
नॉनस्टिक पॅन मध्ये साखर व 2 कप पाणी गरम करायला ठेवा.
एका बाउलमध्ये कॉर्न फलोर व 1 कप पाणी मिक्स करून बाजूला ठेवा. काजू, बदाम, पिस्तेचे तुकडे करून घ्या. ट्रेला तूप लावून बाजूला ठेवा.
पॅन मधील साखर विरघळून 5 मिनिट मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये कॉर्न फलोर चे मिश्रण घालून थोडे घट्ट होई पर्यन्त मंद विस्तवावर गरम करून घ्या. सारखे हलवत रहा गुठल्या होता कामा नये.
मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये लिंबुरस, व लाल किंवा पिवळा किंवा केशरी रंग घालून एक सारखे करून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर व 1 टे स्पून तूप घालून मिक्स करा. मिक्स झाल्यावर परत 1 टे स्पून तूप घालून मिक्स करा मग परत त्यामध्ये 1 टे स्पून तूप व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. तूप घातल्यावर हलवा थोडा पारदर्शक होतो.
आता विस्तव बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून एक सारखे करून घ्या. वरतून थोडे ड्राय फ्रूट घालून सजवून हलक्या हातांनी थोडेसे दाबून घ्या. मग 2 तास बाजूला थंड करायला ठेवा.
बॉम्बे हलवा थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून सर्व्ह करा.