लाल भोपळा पराठा | पमकिन पराठे मुलांना डब्यासाठी रेसीपी
लाल भोपळा आपणा सर्वाना माहिती आहेच. त्याला अशी फार काही चव नसते पण तो थोडा गोड असतो व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात पण त्याना अश्या प्रकारचे निरनिराळे पराठे बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातात. मुलांना शाळेत जाताना डब्यात द्यायला मस्त आहेत किंवा ब्रेकफास्टला सुद्धा बनवायला छान आहेत.
The Lal Bhopla Paratha |Reb Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha can be seen on our YouTube Lal Bhopla Paratha |Reb Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha
लाल भोपळ्या मध्ये कॅलरीज कमी असतात व फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवणाने शरीरातील फॅट्स कमी होतात. व भूक लागत नाही त्यामुळे शरीराचे वजन वाढत नाही. त्याच्या मध्ये विटामीन ए, इ व सी आहे. आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते.
लाल भोपल्याच्या आपण गोड किंवा तिखट पराठा बनवू शकतो किंवा त्याच्या पुऱ्या सुद्धा बनवू शकतो. पुऱ्याला आपण घारगे म्हणतो. लाल भोपल्याचे पराठे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच ते पौष्टिक सुद्धा आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 6 पराठे बनतात
साहित्य:
1 कप लाल भोपल्याच्या कीस
2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून बेसन
½ कप गूळ किसून
1 टी स्पून मीठ
1 टे स्पून तेल
तेल पराठे भाजण्यासाठी
तूप पराठाला लावण्यासाठी
कृती:
प्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्या. गूळ किसून घ्या. किंवा चिरून घ्या.
एका पॅनमध्ये लाल भोपळा कीस घेऊन पॅनवर एक मिनिट झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. मग एक मिनिट झाला की झाकण काढून चमच्यानि हलवून परत एक मिनिट झाकण ठेवा. एक मिनिट झाला की झाकण काढून विस्तव बंद करा व त्याच्या मध्ये चिरलेला गूळ व मीठ चवीने घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवा.
आता मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ व बेसन घालून मिक्स करून जरूरत नुसार थोडे थोडे पाणी घाला एकदम जास्त पाणी घातले तर मिश्रण पातळ होईल साधरण पणे ¼ पेक्षा कमी पाणी लागेल कारण गुळाचे पण पाणी सुटते. पीठ घट्ट मळून झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा.
आता पीठ छान मुरले असेल त्याचे एकसारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन पीठ लाऊन लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा घालून थोडे तेल सोडून छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.
गरम गरम लाल भोपळ्याचे पराठे तूप लावून सर्व्ह करा.