माघ प्रदोश व्रत 2022 तिथी | पूजा मुहूर्त | पूजाविधी | महत्व
हिंदू धर्मामध्ये भगवान शंकर भोलेनाथ ह्यांची उपासना पूजा करण्यांचे खूप महत्व आहे. असे म्हणतात की भगवान शंकर हे फार कृपाळू व दयाळू आहेत ते एक लोटा पाणी अर्पित केले तरी ते प्रसन्न होतात. तसे पहिले तर रोज भगवान शंकर ह्यांना एक लोटा जल अर्पित केल्याने ते प्रसन्न होऊ शकता. पूर्ण महिन्यामध्ये भगवान शंकर ह्यांच्या तिथीला पूजा अर्चा व्रत केल्याने त्यांची कृपा मिळू शकते. त्यामध्ये एक तिथी म्हणजे प्रदोश ह्या तिथीला पूजा अर्चा केल्याने विशेष फळ मिळते.
The Magh Pradosh Vrat 2022 Tithi | Puja Muhurat | Puja Vidhi | Importance can be seen on our YouTube Magh Pradosh Vrat 2022
माघ महिन्यात शुल्क पक्ष ह्या तिथीला भगवान शंकर ह्यांच्यासाठी प्रदोश ह्या दिवशी व्रत ठेवू शकता. ह्या वर्षी 14 फेब्रुवारी 2022 सोमवार ह्या दिवशी प्रदोश व्रत आहे. ह्या दिवशी माता पार्वती व शंकर भगवान ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करू शकता. असे म्हणतात की सोम प्रदोश ह्या दिवशी व्रत केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. व त्याच बरोबर व्रत केल्याचे दुप्पट फळ मिळते. सोमवार हा दिवशी भगवान शंकर ह्यांचा आहे.
प्रदोष व्रत तिथि व शुभ मुहूर्त (Pradosh Vrat Tithi And Shubh Muhurat 2022)
माघ महिन्यात शुक्ल पक्ष 14 फेब्रुवारी 2022 ह्या दिवशी प्रदोश आहे. पंचांगनुसार 13 फेब्रुवारी संध्याकाळी 6:42 मिनिट ह्या दिवशी प्रदोश सुरू होत असून 14 फेब्रुवारी रात्री 8:28 मिनिट पर्यन्त आहे.
ज्योतिष शास्त्रनुसार प्रदोष व्रत (Pradosh Vrat) ची पूजा प्रदोष काळमध्ये करणे जास्त फायदेशीर आहे. पूजा मुहूर्त संध्याकाळी 6:10 मिनिट पासून रात्री 8:28 मिनिट पर्यन्त आहे. ह्या काळात माता पार्वती व भगवान शंकर ह्यांची पूजा अर्चा करतात.
सोम प्रदोष व्रत पूजा विधि (Som Pradoshg Vrta Pujan Vidhi)
प्रदोश व्रत करताना त्याच्या नियमांचे पालन करून करा. प्रदोश व्रत त्रयोदशी ह्या दिवशी ठेवतात. पण द्वादशीच्या दिवसापासूनच त्याचे नियम चालू होतात. ह्या दिवशी चुकूनसुद्धा मसालेदार जेवण करू नका. तसेच त्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्त वर उठावे भगवान शंकर ह्यांना प्रणाम करून दिवसाची सुरुवात करावी. ह्या दिवशी गंगाजल मिक्स करून त्या पाण्यानि आंघोळ करावी. व आपल्या हाताच्या ओंजलीमध्ये गंगाजल घेऊन आचमन करावे. म्हणजे आपण पवित्र होतो. मग स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे.
भगवान सूर्यदेवना जल अर्पित करा. मग भगवान शंकर ह्यांना फळ, फूल, धूप, दीप, अक्षता, धतुरा, दूध, दही, व पंचामृत अर्पित करा. पूर्ण दिवस उपवास करून शिव मंत्र जाप करून आरती म्हणा. तसेच ह्या दिवशी शिव चालीसाचे वाचन करा. संध्याकाळी फलाहार करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.
प्रदोश सिद्धयोग:
माघ महिन्यातील प्रदोश 14 फेब्रुवारी सोमवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी सोम प्रदोश व्रत म्हणजेच सर्वार्थ सिद्ध योग व आयुष्यमान योग आहे. त्यामुळे ह्यादिवशी व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. व प्रदोश काळात पूजा अर्चा केल्याने भगवान शंकर आरोग्य, सुख, शांती, धन व वैभव ची प्राप्ती होते. प्रदोश व्रत केल्याने सर्व दोष दूर होतात. चंद्र देवाला शाप मिळाल्या मुळे कुष्ट रोग झाला होता तर त्यांनी प्रदोश व्रत करून भगवान शंकर ह्याची पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेऊन शाप मुक्त करून घेतले होते. म्हणूनच प्रदोश व्रत हे महत्वपूर्ण आहे.