माघ पूर्णिमा 2022 विशेष धार्मिक महत्व | पूजाविधी | उपाय | मंत्र
हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा ह्या तिथीचे अधिक महत्व असते. दरवर्षी पूर्ण वर्षात 12 पूर्णिमा येतात व प्रतेक पूर्णिमा ह्या दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. माघ महिन्यातील येणारी पूर्णिमा मोठी पूर्णिमा आहे असे मानतात.
The Tasty Magh Purnima 2022 importance | Puja Vidhi | Upay | Mantra can be seen on our YouTube Magh Purnima 2022
आता सध्या माघ महिना चालू आहे. हिंदू कॅलेंडर नुसार हा 11 वा महिना आहे. धार्मिक दृष्टीने माघ महिना हा खूप पवित्र व महत्वपूर्ण मानला जातो. माघ महिन्यात येणारी पूर्णिमा ही माघ पूर्णिमा म्हणून ओळखली जाते. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान करण्याचे विशेष महत्व आहे.
माघ पूर्णिमा 2022 शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार 16 फेब्रुवारी 2022, बुधवार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष ह्या तिथीला पूर्णिमा आहे. ह्या दिवसाला माघ पूर्णिमा आहे. पंचांग नुसार 15 फेब्रुवारी 2022 मंगळवार रात्री 9 वाजून 42 मिनिट ला पूर्णिमा आरंभ होत असून 16 फेब्रुवारी 2022 बुधवार रात्री 1 वाजून 25 मिनिट ला संपणार आहे.
माघ पूर्णिमा महत्व:
पौराणिक मान्यता अनुसार माघ महिन्यात देवी देवता पृथ्वीवर येवून मनुष्यरूप धारण करून प्रयगराजमध्ये स्नान, दान, व जप तप करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी प्रयागराज मध्ये गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवनात सुख शांती समृद्धी मिळते.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी पूजा-पाठ व दान केल्याचे विशेष पुण्य मिळते. ज्योतिष शास्त्रनुसार ह्या वर्षी माघ पूर्णिमा ह्यादिवशी विशेष संयोग येत आहे. जर ह्या खास संयोगच्या दिवशी जर काही खास उपाय केले तर माता लक्षीची कृपा आपल्यावर नेहमी राहते. त्याच बरोबर हे उपाय केलेतर आपले धना संबंधित काही समस्या असतीलतर त्या नष्ट होतील.
माघ पूर्णिमा ह्या दिवशी हे उपाय करून पहा:
1. मानसिक शांतीसाठी पूर्णिमा ह्या दिवशी एका लोटयामध्ये कच्चे दूध, त्यामध्ये साखर व थोडे तांदूळ घालून चंद्रोदयच्या वेळी त्याचे अर्घ्य द्यायचे (म्हणजे कच्चे दूध, साखर व तांदूळ मिक्स करून घेऊन आपल्या ओंजळीत ते घेऊन चंद्राला ते अर्पण करायचे त्याला अर्घ्य म्हणतात) अर्घ्य देताना ” ॐ ऐं क्लीं सोमाय नम:. ” मंत्र जाप करावा.
2. आर्थिक तंगी पासून छुटकारा मिळण्यासाठी माता लक्ष्मीला 11 कौड्या अर्पित करा. मग त्या कौड्याना हळद लाऊन त्याची पूजा करा. दुसऱ्या दिवशी त्या कौड्या एका लाल रंगाच्या कापडात बांधून आपण जेथे पैसे ठेवतो तेथे ठेवा. हा एक सटीक उपाय आहे.
3. धार्मिक मान्यता अनुसार माता लक्ष्मीना खीर अर्पित करा. पूजा झाल्यावर माता लक्ष्मीचा मंत्र जाप करा. त्याच बरोबर तुलसी माता च्या समोर तुपाचा दिवा लावल्याने माता तुलसीची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी राहते.
4. शास्त्रानुसार पूर्णिमा ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून सकाळी लवकर उठून स्नान करून पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करा. त्याच बरोबर माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा. त्यामुळे माता लक्ष्मी आपले कष्ट दूर करील.
5. माघ पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी स्नान करून तुलसी माताच्या समोर भोग अर्पित करा. त्याच बरोबर जल अर्पित करून दिवा लावावा. असे केल्याने रात्रीच्या वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते.
6. माघ पूर्णिमा ह्या दिवशी दान करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी गरीब लोकाना कंबळ, तिळ, गूळ, जोडे, फळ व अन्न दान करावे.
ह्या दिवशी जोरात बोलणे टाळावे. तसेच गृह क्लेश करू नये. गरीब लोकाना मदत करावी. आपली वाणी गोड ठेवावी कोणाला सुद्धा आपल्या बोलण्यातून दुखवू नये. कोणाचा आपमान करू नये.