शनिदेवना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी सोपे उपाय करा
शनिवार म्हणजे शनि देवांचा दिवस ह्या दिवशी काही सोपे करून नारज झालेल्या शनि देवना प्रसन्न करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्या.
आपल्या पुराणांमद्धे शनिदेव ही सूर्य पुत्र आहेत व ते खूप कठोर आहेत व ते चुकीच्या किंवा वाईट कामासाठी दंड सुद्धा देतात. म्हणूनच शनि साडेसातीचे लोक साडेसाती चालू झालीकी खूप परेशान असतात. जेव्हा शनि भगवान आपल्याला अशुभ फळ देतात तेव्हा आपला वाईट काळ चालू असतो. म्हणूनच शनिवार हा दिवस सकारात्मक करण्यासाठी शनिवार ह्या दिवशी शनि देवना खुश करण्यासाठी चांगला दिवस आहे.
The Shani Sade Sati Pida Upay can be seen on our YouTube Shani Sade Sati Pida Upay
शनिवार ह्या दिवशी शनिदेवना प्रसन्न करण्यासाठी खाली दिलेले उपाय करा:
1. शनिवार ह्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा पान दिवा लावताना त्यामध्ये काळे तीळ व काळे उडीद घालायला विसरू नका.
2. शनिवार ह्या दिवशी गरीब माणसाला दान करून जरूरतमंद ना मदत करा. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन शुभ फळ देतील.
3. शनिवार ह्या दिवशी कोणती सुद्धा लोखंडाची वस्तु देवळात दान करा त्यामुळे शनिदेव शुभ फळ देईल.
4. शनिवार ह्या दिवशी मोहरीच्या तेल घेऊन त्यांनी अंगाला मालीश करून स्वच्छ आंघोळ करावी.
5. शनिवार ह्या दिवशी गहू दळावे व दळताना त्यामध्ये काळे चणे घालावे त्यामुळे शनिदेव करून आर्थिक प्राप्तीचे वरदान मिळते.
6. शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीचा दिवा लावावा त्यामुळे शनिचा अशुभ प्रभाव समाप्त होतो.
7. शनिवार ह्या दिवशी काळ्या मुंग्याना साखर व गव्हाचे पीठ मिक्स करून खायला द्यावे. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव संपतो.
8. असे म्हणतात की शनिवार ह्या दिवशी बजरंग बलीची पूजा केल्याने सुद्धा शनि प्रभाव कमी होतो. ह्या दिवशी हनुमान चाळिसा किंवा बजरंग बाणचा जाप करावा.
9. ज्यांची शनि साडेसाती चालू आहे त्यांनी हनुमान चाळिसा वाचावी.
10. शनिवारच नाही तर इतर दिवशी सुद्धा खोटे बोलू नये, कपट करू नये, कोणाचा अपमान करू नये, शनिवार ह्या दिवशी दारू पिऊ नये, जर शनीची कृपा दृष्टी पाहिजे असेल तर वाईट काम करू नये. कारण शनिदेव ही न्याय देवता आहेत. वाईट कामाचे कर्म ते लगेच देतात.