10 मिनिटात इंस्टेंट क्रिस्पी साबूदाना वडा साबूदाना बिना भिजवता
साबुदाणा वडा हा सर्वाना आवडतो. साबुदाणा वडा आपण उपवासच्या दिवशी व इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. साबुदाणा वडा वरतून मस्त कुरकुरीत असेल व आतून थोडा ओलसर असेल तर मस्त लागतो.
The Tasty Crispy Instant Sabudana Vada in 10 Minutes can be seen on our YouTube Tasty Crispy Instant Sabudana Vada in 10 Minutes
साबुदाणा वडा बनवायचा असेलतर आपल्याला अगोदर 7-8 तास साबूदाणा भिजत ठेवावा लागतो. काही वेळेस आपण कामाच्या गडबडीत साबूदाणा बिजवायला विसरून जातो. पण आपण साबूदाणा बिना भिजवता सुद्धा मस्त टेस्टी कुरकुरीत वडे बनवू शकतो. साबुदाणा वडे बनवताना काही महिला म्हणतात की आमचे वडे तळताना फुटतात किंवा गरम तेल उडते. आपण जर अश्या प्रकारे वडे बनवले तर ते बिलकुल फुटणार नाहीत. आपण अगदी 10 मिनिटात साबुदाणा वडे बनवू शकतो.
आता महाशिवरात्री आली आहे सर्वांचा उपवास असेल तेव्हा अश्या प्रकारचे झटपट साबूदाणा वडे बनवून पहा.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 12-14 वडे बनतात
साहित्य:
1 कप साबूदाणा
2 मोठ्या आकाराचे बटाटे (उकडून)
¼ कप शेंगदाणा कूट
4-5 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून जिरे
2 टे स्पून कोथिंबीर (धुवून चिरून)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: शेंगदाणे भाजून, सोलून कूट करून बाजूला ठेवा. बटाटे उकडून, सोलून व किसून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून, चिरून घ्या.
एक कप साबूदाणा मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून पाउडर करून घ्या. मग एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये ग्राइंड केलेला साबूदाणा, किसलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, कोथिंबीर, जिरे घालून मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. मिश्रण मळताना पाणी आजिबात वापरायचे नाही. बटाट्यामद्धेच मळून घ्यायचे.
कढई मध्ये तेल गरम करून प्रथम मोठ्या विस्तवावर साबुदाणा वडे सोडावे मग मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून घ्यावे. वडे तळल्यावर टिशू पेपरवर ठेवावे म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
गरम गरम साबूदाणा वडे चटणी बरोबर सर्व्ह करा.