सॉफ्ट खमण इन्स्टंट ढोकळा | ढोकळा गुजराती स्टाईल बिना सोडा
ढोकळा हा सर्वाना आवडतो. ढोकळा ही गुजराती लोकांची लोकप्रिय डिश आहे. पण कालांतराने ती प्रतेक भागात लोकप्रिय होत गेली. आपल्याला घरच्या घरी हलवाया सारखा सॉफ्ट मुलायम ढोकळा बनवता येतो. अगदी झटपट ढोकळा आपण बनवू शकतो.
The Tasty Soft Khaman Instant Dhokla can be seen on our YouTube Khaman Instant Dhokla Gujarati Style
आपण ढोकळा बनवताना दल व तांदूळ 8-10 तास भिजवून वाटून परत 7-8 तास झाकून बाजूला ठेवतो मग ढोकळा बनवतो. ह्या रेसीपीमध्ये आपल्याला तसे करायची गरज नाही. अगदी झटपट 15 मिनिटात आपण खमन ढोकळा बनवू शकतो. त्यासाठी आपण घरातील बेसन व इनो फ्रूट सॅल्ट वापरायचे आहे. व छान आंबट-गोड व थोडासा तिखट बनवण्यासाठी लिंबुरस, साखर व आल-लसूण व हिरवी मिरची वापरायची आहे.
इन्स्टंट ढोकळा आपण कोणी अचानक पाहुणे आले किंवा मुलांच्या पार्टीला किंवा नाश्तासाठी किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. व तो आकर्षक बनवण्यासाठी इडली स्टँडमध्ये बनवला तर अजून मस्त दिसतो. तसेच त्याच्यावर सजावट करून टेबलवर ठेवल्यास अजून मस्त.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप बेसन
1 टे स्पून रवा
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
¼ टी स्पून हळद
1 चमचा लिंबुरस
1 टी स्पून साखर
1 टी स्पून तेल
1 टी स्पून इनो फ्रूटसॅल्ट
मीठ चवीने
तेल इडली स्टँडला लावण्यासाठी
फोडणीसाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
सजावटीसाठी:
कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी, ओला नारळ
कृती: आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या. इडली स्टँडला तेल लावून बाजूला ठेवा. कुकरची शिट्टी काढूनत्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवा.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये बेसन, रवा, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये ½ कप पाणी किंवा जरूरत नुसार पाणी वापरुन मिश्रण बनवा. मग त्यामध्ये लिंबुरस, साखर, मीठ घालून मिश्रण बनवून घ्या. मिश्रण फार पातळ होता कामा नये. सर्वात शेवटी इनो घालून हळुवार पणे मिश्रण हलवून घ्या. इनो घातल्यावर मिश्रण फस फसायला लागेल.
आता तयार झालेले मिश्रण इडली स्टँडमध्ये एक एक डाव घाला. मग इडली स्टँड कुकरमध्ये ठेवून झाकण लाऊन 12 मिनिट स्टीम करून घ्या. 12 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून इडली स्टँड बाजूला थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर ढोकळा काढून प्लेटमध्ये ठेवा.
आता आपण ढोकळा अगदी मुलायम बनवण्यासाठी 2 टे स्पून पाणी, ¼ टी स्पून लिंबुरस, ¼ टी स्पून पिठीसाखर, चिमूट मीठ घालून मिश्रण तयार करून घ्या.
फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व कडीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्या व बाजूला थंड करायला ठेवा.
ढोकळा प्लेटमध्ये काढल्यावर त्याच्या वर लिंबू-साखरेचे मिश्रण ढोकळ्यावर थोडेसे घालून घ्या. मिश्रण असे घालावे की सर्व ठिकाणी लागले पाहिजे मग त्यावर तयार केलेली फोडणी घालून थोडासा टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी घालून थोडीशी कोथिंबीर चिरून घाला.
खमन सॉफ्ट झटपट इन्स्टंट ढोकळा सर्व्ह करा.