टेस्टि व्हेजिटेबल मसाला इडली मुलांच्या डब्यासाठी
इडली हा पदार्थ साऊथह्या भागातील लोकप्रिय पदार्थ आहे. पण हळू हळू भारतातिल इतर प्रांतात लोकप्रिय होत गेला. आता तर परदेशात सुद्धा लोकप्रिय झाला आहे. इडली हा पदार्थ आपण सर्वजण जाणता. इडली पचायला हलकी आहे त्याच बरोबर आपण नाश्तासाठी किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.
The Tasty Spicy Vegetable Masala Idli For Kids Tiffin can be seen on our YouTube Tasty Spicy Vegetable Masala Idli South Indian Style
इडलीचे बॅटर आपण घरी सुद्धा बनवू शकतो. त्यासाठी 2 कप साधे तांदूळ व 1 कप उडीदडाळ स्वच्छ धुवून 7-8 पाण्यात भिजत ठेवा. मग ग्राइंडर मध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना फार पाणी घालायचे नाही. डाळ व तांदूळ वाटून झाल्यावर परत 7-8 तास झाकून बाजूला ठेवा. इडली मिश्रण चांगले फसफसून येईल मग त्याची इडली बनवा खूप सॉफ्ट होते. जर मिश्रम फसफसले नाही तर इडली हलकी होत नाही. थंडीच्या दिवसांत मिश्रण फसफसून येते नाही त्यासाठी एक टीप आहे. इडली मिश्रणाच्या भांड्यावर गरम म्हणजे ब्लँकेट किंवा जाड चादर घालावी म्हणजे मिश्रण चांगले फसफसून येते.
आता आपण इडली बॅटर बनवून त्यामध्ये भाज्या व थंड फोडणी घालून इडली बनवली तर ती अजून छान टेस्टी लागते व न्यूट्रिशियस सुद्धा आहे. मुले अश्या प्रकारची इडली आवडीने खातात. मसाला इडली बरोबर चटणी किंवा सांबर नसेलतरी चालते. मसाला इडली आपण कोणी पाहुणे येणार असतील किंवा मुलांच्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाफवण्यासाठी वेळ: 12-15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
4 कप इडली बॅटर
1 टी स्पून चनाडाळ (भिजवून)
1 टी स्पून उडीदडाळ (भिजवून)
2 टे स्पून गाजर (बारीक चिरून)
2 टे स्पून मटार ताजे
2 टे स्पून शिमला मिरची (चिरून)
2 टे स्पून स्वीट कॉर्न दाणे
2 टे स्पून काजू (तुकडे)
2 हिरवी मिरची (तुकडे करून)
1” आले पेस्ट
मीठ चवीने
फोडणीसाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
¼ टी स्पून हळद
7-8 कडीपत्ता पाने
कृती: प्रथम इडली बॅटर बनवून घ्या. 2 तास चनाडाळ व उडीदडाळ भिजत ठेवा. इडली स्टँडला तेल लाऊन ठेवा. आल पेस्ट करून घ्या.
फोडणी करून बाजूला थंड करायला ठेवा. गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
इडली बॅटरमध्ये चिरलेल्या भाज्या, आल पेस्ट, थंड झालेली फोडणी, डाळ व मीठ चवीने घालून मिश्रण एक सारखे बनवून घ्या.
कुकरमद्धे पाणी गरम करायला ठेवा. मग इडली स्टँड मध्ये एक एक डाव बॅटर घालून स्टँड कुकरमध्ये ठेवा. कुकरचे झाकण लाऊन शिट्टी काढून ठेवा. व इडली 12-15 मिनिट वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून इडली स्टँड बाहेर काढून इडली थोडीशी थंड झाली की प्लेटमध्ये काढून घ्या.
गरम गरम वेजिटेबल मसाला इडली सर्व्ह करा.