रविवारच्या दिवशी हे उपाय करून सूर्य देवना करा प्रसन्न
आपल्या प्राचीन ग्रंथानुसार रोज सूर्य देवाला जल अर्पित करणे चांगले मानले जाते पण रविवारच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पित करणे जास्त पुण्यदायक आहे. कारणकी रविवार हा दिवस सूर्य भगवान ह्यांचा आहे.
The Surya Bhagwan Ravivar Che Totke can be seen on our YouTube Totke For Sunday
हिंदू धर्मामध्ये रविवार हा दिवस सूर्य देवना समर्पित आहे असे मानले जाते. ह्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चा केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात. सूर्य देवाची नियमित पूजा अर्चा केल्यास भक्ताच्या दुखचा नाश होतो. त्याच बरोबर समाजात मान सन्मान मिळतो. त्याच बरोबर आपल्या कामात आपल्याला यश मिळते. आपण सूर्य देवाला रोज क]जल अर्पित करू शकता पण रविवार ह्या दिवशी जल अर्पित करणे खूप पुण्याचे आहे. आपण पूजा अर्चा करतो त्याच बरोबर आदित्य हृदय स्तोत्रचे वाचन किंवा पठन करावे त्यामुळे सूर्य देव प्रसन्न होतात व आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. सूर्य देव असे देवता आहेत की ते रोज भक्ताना प्रत्यक्ष नियमित दर्शन देतात. ज्योतिष शास्त्रा नुसार सूर्य हा ग्रह चांगल्या म्हणजे शुभ स्थानात असला तर भाग्यदायक असतो.
सूर्य देवता ह्यांना प्रसन्न करण्याचे काही सोपे सरल उपाय:
1. रविवार ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला जल अर्पित करा. असे म्हणतात की असे केल्याने आपली आर्थिक तंगीच्या समस्या दूर होतात. आपण जलमध्ये थोडासा गूळ घालून सूर्य भगवानना अर्घ्य देवू शकता (म्हणजे कलशमधील गूळ मिश्रित पाणी आपल्या हाताच्या ओंजळीत घेऊन अर्घ्य देतात) असे करणे शुभ मानले जाते.
2. असे म्हणतात की सूर्य भगवान हयना लाल रंग खूप प्रिय आहे. आपण सूर्य भगवान हयना जल अर्पित करताना त्यामध्ये कुंकू मिक्स करून अर्पित करा त्यामुळे सूर्य भगवान प्रसन्न होतील. किंवा लाल रंगाचे फूल अर्पित करा.
3. कुंडलीमधील सूर्य ग्रह ताकतवार बनवण्यासाठी रविवार ह्या दिवशी उपवास करावा.त्यामुळे समाजात मान सन्मान मिळतो. त्याच बरोबर सर्व कार्यात सफलता मिळते. पण उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ वापरू नये.
4. रविवार ह्या दिवशी महत्वाच्या कामाला जाताना गाईला रोटी खायला घालावी मग कामाला जावे आपले काम नक्की होईल.
5.रविवार ह्या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या बनवून खाऊ घालणे शुभ असते. ह्याच दिवशी मुंग्याना साखर खाऊ घालणे सुद्धा शुभ मानले जाते.
6. जिवनात सुख समृद्धी मिळण्यासाठी पिवळ्या रंगाच्या कापडात शुद्ध कस्तूरी बांधून तिजोरी मध्ये ठेवणे शुभ मानले जाते.
7.रविवारच्या दिवशी पैशाचे कोणते सुद्धा व्यवहार करू नये असे म्हणतात. असे केल्याने घरात दरिद्रता येते असे म्हणतात.