बसबोसा पॉप्युलर मिडलिस्ट (अरेबिक) डेझर्ट विदाउट एग रेसीपी
बसबोसा ही एक डेझर्ट रेसीपी असून मिडलिस्टमध्ये लोकप्रिय आहे. बसबोसा ही डिश आपण जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो किंवा कोणी पाहुणे आलेतर स्वीट डिश म्हणूनच सर्व्ह करायला छान आहे.
The Basbousa / Revani / Popular Middle Eastern Dessert Without Egg can be seen on our YouTube Basbousa / Revani / Popular Middle Eastern Dessert
बसबोसा बनवण्यासाठी रवा, साखर, तेल व दूध वापरले आहे. आपल्याला मिश्रण बनवून बेक करून वरतून साखरेचा सीरप घालायचा आहे. थोडी वेगळी पद्धत आहे. मुलांना अश्या प्रकारची स्वीट डिश नक्की आवडेल. किंवा आपल्या घरी छोटी पार्टी असेलतरी सुद्धा बनवायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 40-45 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप रवा (बारीक)
1/3 कप साखर
¼ कप तेल
¾ कप दूध
1 टी स्पून बेकिंग पाऊडर
एक चिमूट मीठ
शुगर सीरपसाठी:
½ कप पाणी
1/3 कप साखर
½ टी स्पून लिंबुरस
4-5 थेंब केवडा एसेन्स
कृती: एका बाउल मध्ये रवा, साखर, तेल, दूध, बेकिंग पावडर, मीठ घालून हळुवार पणे मिक्स करून घेऊन 20 मिनिट झाकून ठेवा. ज्या मायक्रोवेव्ह बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला बेक करायचे आहे त्याला तेल लाऊन बाजूला ठेवा. मायक्रोवेव्ह प्रीहीट करायचा पण लगेच करू नका कारणकी आपल्याला मिश्रण बनवून 20 मिनिट बाजूला ठेवायचे आहे.
आता 20 मिनिट झाल्यावर प्लेट काढून मिश्रण हळुवार पणे एक सारखे करून मग तेल लावलेल्या बाउलमध्ये ओतून एक सारखे करून घ्या. त्यावर काजू बदाम ने सजावट करून घ्या. मग मायक्रोवेव्ह प्रीहीट झाला असेलतर त्यामध्ये बाउल किंवा प्लेट ठेवून 180 डिग्रीवर सेट करून 40-45 मिनिट बेक करा.
बेक होईपर्यन्त आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी विस्तवावर एक कढई किंवा भांडे ठेवून त्यामध्ये साखर व पाणी घालून एक उकळी येवू द्या. मग त्यामध्ये लिंबुरस व एसेन्स घालून मिक्स करून परत एक उकळी येवू द्या. साधारणपणे 2 मिनिट उकळी येवू द्या. आपल्याला पाक थोडा पातळच ठेवायचा आहे. पाक झाल्यावर विस्तव बंद करून भांडे बाजूला ठेवा.
केक बेक झाल्यावर मायक्रोवेव्ह मधून बाहेर काढून गरम असताना त्यावर साखरेचा पाक एक सारखा ओतून बाजूला थंड करायला ठेवा.
मग डेझर्टच्या मस्त पैकी तुकडे कापून सर्व्ह करा.