सोपे मऊ दहीवडे (दही भल्ले) सिक्रेट मसाला वापरून
आता उन्हाळा म्हणजेच गरमी चालू झाली आहे त्यामुळे आपल्याला सारखे थंड गार प्यावेसे वाटते किंवा खावेसे वाटते. आता मुलांच्या शाळांना सुद्धा सुट्या लागतील. मग रोज छान थंडगार कोणते पदार्थ बनवायचे.
दही वडे ही डिश सर्वाना आवडते. आपण पार्टीला किंवा लग्न समारंभ मध्ये दही वडे अगदी आवर्जून बनवतो. पण बऱ्याच वेळा असे होते की दही वडे छान मऊ बनत नाहीत मग टे खायची मज्जा येत नाही.
The Tasty Delicious Soft Dahi Vada With Secret Masala Recipe can be seen on our You tube Chanel Dahi Vada With Secret Masala
आपल्याला जर पार्टी सारखे मऊ लुशलुशीत दहीवडे बनवायचे असतील तर काही टिप्स आहेत त्या आपण पाहिल्या तर आपले दही वडे अगदी लग्न समारंभ सारखे छान बनतील.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 40 वडे बनतात (मध्यम आकाराचे)
साहित्य:
1 वाटी उदीडदाळ
½ लिटर दूध
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
सिक्रेट मसाला बनवण्यासाठी:
1 चमचा जिरे
1 चमचा ओवा
½ टी स्पून चाट मसाला
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून पुदिना पावडर (एछिक)
मीठ चवीने
सजावटी करिता:
सिक्रेट मसाला
चिंचेची गोड चटणी
हिरवी चटणी
आलू भुजिया
कृती: प्रथम उदीडदाळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत ठेवा.
सीक्रेट मसाला बनवण्यासाठी: छोटी कढई किंवा तवा गरम करायला ठेवा. त्यामध्ये जिरे व ओवा थोडासा गरम करून घेऊन थंड करायला ठेवा. मग भजलेला ओवा, जिरे, लाल मिरची पावडर, चाट मसाला व मीठ मिक्स करून पोलपाटावर लाटण्यानी जाडसर वाटून घ्या, (मिक्सर मध्ये वाटायचे नाही)
दही आधल्या दिवशी म्हणजे रात्री लावून ठेवा. सकाळी छान फ्रीजमद्धे थंड करायला ठेवा. दही वडे बनवण्या अगोदर दही एका भांड्यात घेऊन त्यामध्ये पिठीसाखर व मीठ घालून रवीने मिक्स करून घ्या. मग परत फ्रीजमद्धे थंड करायला ठेवा.
उदीडदाळ 4 तास भिजल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. उदीडदाळ वाटताना पाणी अगदी कमी घाला (मिश्रण पातळ होता कामा नये नाहीतर वडे खूप तेलकट होतात व खूप घट्ट वाटले तर वडे मऊ होत नाहीत) मग वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये चवीने मीठ घालून मिक्स करून चमच्यानी चांगले फेटून घ्या. आपण मिश्रण जेव्हडे फेटून घेऊन तेव्हडे वडे छान हलके होतात.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये छोटे छोटे वडे घालून छान गुलाबी रंगावर तळून घ्या. वडे तळून झालेकी टिशू पेपरवर ठेवा.
एका बाउल मध्ये कोमट पाणी करून घ्या मग त्यामध्ये तळलेले वडे घालून झाकून 2 तास ठेवा. मग दोन तासा नंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये साधे पाणी घेऊन त्यामध्ये सर्व वडे घाला व परत दोन तास झाकून ठेवा. आता दोन तासा नंतर पाण्यातील एक वडा घेऊन त्यातील पाणी हलक्या हातांनी दाबून काढा व एका बाउल मध्ये ठेवा अश्या प्रकारे सर्व वड्यातिल पाणी काढून वडे बाउलमध्ये ठेवा. मग त्यावर थंड दही घालून सीक्रेट मसाला, चिंच खजूर चटणी, सीक्रेट मसाला मग वरतून शेव घालून मस्त पैकी सर्व्ह करा.