सहज सोपी रव्याची सुंदर मिठाई बिना खवा किंवा मावा
मिठाई म्हंटलेकी आपल्या डोळ्यासमोर खवा मावा येतो. पण आपण खवा किंवा मावा ण वापरता सुद्धा घरी अगदी सोप्या पद्धतीने मिठाई बनवू शकतो. तसेच ती पचायला सुद्धा हलकी होते. त्याच बरोबर दिसायला आकर्षक दिसते व फार कष्ट न घेता बनवता येते.
The Easy Swadisht Suji Rava Mithai can be seen on our Video Easy Swadisht Suji Rava Mithai
रव्याची मिठाई बनवताना रवा भाजून घेऊन बनवली आहे. आपण नेहमी खवा किंवा मावा बनवून मिठाई बनवतो पण जर अश्या प्रकारे मिठाई बनवली तर सर्वाना आवडेल व तुम्ही म्हणताल की ह्या अगोदर आपण का नाही बनवली.
रव्याची मिठाई आपण सणवाराला बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो किंवा इतर वेळी सुद्धा डेझर्ट म्हणून बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 25 पिसेस बनतात
साहीत्य:
1 कप रवा
1 ½ कप दूध
1 टे स्पून तूप
¾ कप पिठीसाखर
¼ कप डेसिकेटेड कोकनट
1 टी स्पून विलची पावडर
कृती: नॉनस्टिक पान गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा घालून मिक्स करून मंद विस्तवावर भाजून घ्या. रवा भाजल्यावर छान खुशबू आली पाहिजे. मग त्यामध्ये हळू हळू दूध घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण थोडे घट्ट झाले पाहिजे. मिश्रण घट्ट झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. थोडेसे गरम असतानाच हाताला तूप लावून चांगले मऊ मळून घ्या. मिश्रण चांगले मळून झालेकी की त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकनट घालून परत चांगले मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे लांबट आकाराचे गोळे बनवून घ्या.
एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवा व त्यावर ते लांबट गोळे अरेंज करून ठेवा. मग चाळणीवर झाकण ठेवून 12 मिनिट त्याला स्टीम द्या. मग झाकण काढून एका प्लेटमध्ये सर्व गोळे काढून घ्या. एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकनट घ्या. त्यामध्ये ते गोळे घोळून घ्या. पाहिजे असेलतर वरतून ड्रायफ्रूटने सजवा. मग सर्व्ह करा.