गुढी पाडवा 2022 तिथी मुहूर्त व धार्मिक महत्व
गुढी पाडवाच्या दिवशी गुडी कशी उभारायची व त्याचे महत्व काय आहे येथे क्लिक करून पहा: गुडी कशी उभारायची
गुढी पाडवा ह्या दिवशी पूजे साठी गाठीची माळ कशी बनवायची येथे क्लिक करून पहा: गाठीची माळ कशी बनवायची
भारतात बरेच धार्मिक सण, वार किंवा उत्सव साजरे केले जातात. अश्याच उत्सवामध्ये एक सण म्हणजेगुढी पाडवाहोय. गुढी पाडवा ह्या सणाच्या काही धार्मिक कथा सुद्धा जोडल्या गेल्या आहेत. तिथी नुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या तिथीला गुडी पाडवा साजरा केला जातो. ह्या दिवसा पासून चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होते. गुडी पाडवा साजरा करण्यामागे बऱ्याच मान्यता आहेत. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान ब्रम्हा ह्यांनी सृष्टिची रचना केली त्याच बरोबर असे म्हणतात की ह्या दिवसा पासून सतयुग सुरू झाले. म्हणून ह्या दिवशी पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे. तसेच प्राचीन काळा नुसार प्रभ श्रीराम ह्यांनी बळीचा वध करून दक्षिण भारत मधील जनतेला त्याच्या त्रासा पासून मुक्त केले होते. चला तर मग आपण पाहू या गुडी पाडवाचे महत्व काय आहे.
The Gudi Padwa 2022 Tithi Muhurat W Dharmik Mahatva can be seen on our You tube Chanel Gudi Padwa 2022
गुड़ी पाडवा 2022 तिथि व मुहूर्त:
1 एप्रिल शुक्रवार 11 वाजून 53 मिनिट पासून चैत्र महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी चालू होते व दुसऱ्या दिवशी शनिवार सकाळी 11 वाजून 58 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून गुढी पाडवा 2 एप्रिल साजरा करायचा आहे.
गुढी पाडवा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू पंचांग नुसार साडेतीन मुहूर्त मानले जातात त्यामध्ये गुडी पाडवा, अक्षय तृतीया, दसरा व दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढी पाडवा हा दिवस पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे ह्या दिवशी गृह प्रवेश करतात किंवा नवीन काम धंदा सुरू करतात किंवा नवीन वस्तु खरेदी करतात किंवा ह्या दिवशी सोने सुद्धा खरेदी करतात त्यामुळे आपल्या घरात बरकत भरभराट होते.
गुढी पाडवा महत्व:
महाराष्ट्रमध्ये गुडीपाडवा हा सण खूप श्रद्धा पूर्वक साजरा केला जातो हिंदू मराठी कॅलेंडर नुसार ह्या दिवसा पासून नवीन वर्ष सुरू होते. भारतात प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो.
महाराष्टमध्ये प्रतेक घरात दारासमोर सुंदर गुडी उभारून त्याची पूजा करून हा सण साजरा केला जातो. असे म्हणतात की गुडी उभारून त्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते व घरातील नकारात्मक शक्ति निघून सकारात्मक ऊर्जा घरात येते.
गुढी पाडवा ह्या दिवशी गुडी उभरतान कडीलिंबूची पाने लावतात व ह्या दिवशी कडीलिंबाची पाने व चिंच ह्याची चटणी सेवन सुद्धा करतात त्याच्या मुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपले शरीर आतून मजबूत बनते.
प्राचीन काळा पासून असे म्हणतात की वीर मराठा छत्रपति शिवाजी महाराज हयाणी युद्ध जिकल्यावर सर्वात पहिल्यांदा गुडी उभारून हा सण साजरा केला होता. मग मराठी लोकांनी प्रतेक वर्षी गुडी उभारन्यास सुरवात केली. म्हणजेच गुडी उभारून विजय पताकाचे रूप मानून हा सण साजरा करतात.