होळी दहन 2022 पूजा मुहुर्त, शुभयोग, पूजाविधी, उपाय व मंत्र
होळी हा सण रंग, उमंग व नवीन ऊर्जा निर्माण करणारा सण आहे. वाईट कर्मावर चांगल्या कर्माची जीत ह्याचे प्रतीक असे मानणारा सण आहे. फाल्गुन पूर्णिमा ह्या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
The Holi 2022 Puja Muhurat, Yog, Puja Vidhi, Upay, Mantra Recipe can be seen on our You tube Chanel Holi Pornima 2022
फाल्गुन पूर्णिमा ह्या वर्षी 17 मार्च 2022 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी रात्री होळीची पूजा केली जाते व नंतर नेवेद्य दाखवून भोजन केले जाते. धार्मिक दृष्टीने होळी ह्या सणाला फार महत्व आहे. 17 मार्च गुरुवार ह्या दिवशी होळी झाल्यावर 18 मार्च शुक्रवार ह्या दिवशी धूलिवंदन आहे. होळी चे दहन केल्यावर आस-पास ची नकारात्मक शक्तिचा नाश होतो.
होळी दहन शुभ मुहुर्त:
होळी दहन ह्या वर्षी 17 मार्च 2022 गुरुवार ह्या दिवशी आहे. तसेच होळी दहनचा शुभ मुहुर्त रात्री 9 वाजून 20 मिनिट पासून 10 वाजून 31 मिनिट पर्यन्त आहे. म्हणजेच होळी दहनचा मुहुर्त 1 तासाचा आहे. मग शुक्रवार 18 मार्चला धूलिवंदन आहे.
होळी ह्यादिवशी होणारे शुभ योग:
ह्या वर्षी होळी हा सण खूप खास होणार आहे. ह्या वर्षी बरेच शुभ योग होणार आहेत. ह्या वर्षी वृद्धी योग, अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग व ध्रुव योग होणार आहे. त्याच बरोबर बुध-गुरु आदित्य योग सुद्धा होणार आहे. बुध-गुरु आदित्य योग वर होळी ची पूजा केल्यास घरात सुख-शांती येते.
होळी दहन पूजाविधी:
होळी दहनच्या अगोदर स्नान करून जेथे होळी दहन करायची आहे तेथे उत्तर-पूर्व दिशेला तोंड करून बसावे.
होळी पेटवण्यासाठी गाईच्या शेणाच्या गौरया ठेवाव्या.
होळीच्या पूजेसाठी धूप, फूल, गूळ,हळद, बताशे, गुलाल व नारळ अर्पित करावा . मग विधी पूर्वक पूजा करावी.
भोग म्हणून मिठाई किंवा फळ ठेवावे.
भगवान नरसिंह ह्यांची विधी पूर्वक पूजा करावी.
मग होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा ह्या 4. 7 किंवा 11 वेळा माराव्या. प्रदक्षिणा मारताना तांब्याचा कलश पाणी भरून घ्यावा. त्या अगोदर काळे तीळ, मोहरी व मीठ आपल्या डोक्यावरून फिरवून अग्निमध्ये टाकावे. मग होळीला प्रदक्षिणा घालताना तांब्यामधील पाणी हळू हळू सोडावे. पाणी सोडताना ओं नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र जाप करावा.
होळीच्या दिवशी चुकून सुद्धा खाली दिलेली काम करू नये:
होळीदहन च्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नये. कारण ह्या दिवशी नकारात्मक शक्ति जास्त प्रभवी होते.
होळी दहन च्या वेळी आपल्या डोक्यावर रुमाल किंवा ओढणी किंवा पदर घ्यावा.
होळी ह्या दिवशी टोणे-टोटके जास्त प्रमाणात केले जातात म्हणून ह्यादिवशी कोणच्या म्हणजे अनोळखी घरी जेऊ नये.
होळीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये व दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये.
असे म्हणतात की नवविवाहित महिलानी होळी दहन होताना पाहू नये त्यामुळे त्यांच्या जीवनात समस्या येऊ शकतात.
होळी दहन च्या वेळी मादक पदार्थ सेवन करू नये.
होळी च्या दिवशी रात्री तंत्र केले जातात म्हणून सुनसान जागी जावू नये.
होळी ह्या सणाच्या दिवशी खाली दिलेले उपाय करावे:
होळी दहन केल्यावर राहिलेली राख खूप पवित्र मानली जाते. होळीच्या ह्या राखचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात. ते उपाय काय आहेत ते आता आपण पाहूया.
1 पहिला उपाय:
आपल्या घरात भांडणे जास्त प्रमाणात होत असतीलतर होळीची राख घेऊन एक पुरचुंडी बांधावी व घरात वेगवेगळ्या कोर्नरला ठेवावी. त्यामुळे बऱ्याच फायदा होतो घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. घरात ती अशा जागी ठेवा की ज्या जागी आपल्याला भांडणाचा जास्त त्रास होतो. मग दुसऱ्या दिवशी घरच्या बाहेर फेकून द्यावी.
2. दूसरा उपाय:
आपल्या घरातील व्यक्ति किंवा लहान मुले हयाना लवकर नजर लागते किंवा ती व्यक्ति सारखी आजारी पडते त्या व्यक्तीच्या डोक्या पासून पाया पर्यन्त एंटी क्लॉक वाईज होळी ची राख घेऊन उतारा करा व ती राख घराच्या बाहेर किंवा बागेत टाका.
3. तिसरा उपाय:
होळीच्या राख घेऊन सुद्धा आपल्या आर्थिक परेशानी दूर करता येतात. एका लाल रंगाच्या कापडात थोडीशी होळीची राख घेऊन त्याची पोटळी बांधवी व ती पोटली आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. त्याच बरोबर थोडीशी राख आपल्या पर्समध्ये कोर्नरला ठेवावी. त्याच बरोबर घरात कोणते चांगले कार्य असेलतर घरातील सर्व व्यक्तिनी होळीची राख घेऊन त्याचा टीका कपाळावर लावावा. त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होऊन त्याची शुभ फळे आपल्याला मिळतील.
टीप: आपंचे चॅनेल किंवा वेबसाइट कोणती सुद्धा हमी देत नाही, ही माहिती फक्त आपल्याला माहिती होण्यासाठी देत आहोत.