एग (अंड्याचा) मेयोनिज सॉस 5 मिनिटांत घरी कसा बनवायचा
अंड्याचा मेयोनिज सॉस आपण घरी अगदी पांच मिनिटांत बनवू शकतो. मेयोनिज सॉसला मायो सॉस सुद्धा म्हणतात. मेयोनिज सॉस हा खूप छान क्रिमी व चविष्ट लागतो. तसेच फ्रीजमद्धे 2-3 दिवस छान टिकतो. मुलांना भूक लागली तर आपण लगेच ब्रेडला किंवा चपातीला लाऊन रोल बनवून सर्व्ह करू शकतो.
The In 5 Minutes Egg Mayonnaise Sauce Recipe can be seen on our You tube Chanel Egg Mayonnaise Sauce
मेयोनिज सॉस बनवताना अंडी व दूध वापरले आहे त्यामुळे तो पौष्टिक सुद्धा आहे. आपण ब्रेड सँडविच बनवताना मिरे पावडर घालून मेयोनिज सॉस लावून सर्व्ह करू शकतो.
अंड्याचा मेयोनिज सॉस बाजारात मिळतो पण त्याची किमत फार आहे तर आपण अगदी सोप्या पद्धतीने सॉस घरी बनवू शकतो. त्यामध्ये पांढरे व्हेनिगर वापरले आहे त्यामुळे त्याच्या मध्ये बॅकटेरिया होत नाही. मेयोनिज सॉस वापरुन पास्ता, सॅलड किंवा सँडविच बनवू शकतो.
तयारी करण्यासाठी वेळ: 5 मिनिट
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 1 कप सॉस बनतो
साहित्य:
1 ½ कप दूध
2 अंडी (फक्त योक)
2 टे स्पून कॉर्न फलोर
2 टी स्पून साखर
1 टे स्पून मोहरी डाळ (पावडर)
2 टे स्पून व्हेनिगर पांढरे
मीठ चवीने
मिरे पावडर सँडविच बनवतात
कृती: प्रथम दूध गरम करून गार करून घ्या. मोहरीची डाळ कुटून घ्या.
एका वाटी घ्या. एका अंड्याचे टरकल वरच्या बाजूनी अगदी थोडेसे चमचानी फोडून घेऊन त्यामधून अंड्यातील पांढरा भाग वाटीमद्धे हळुवार पणे ओतून घ्या. म्हणजे अंड्यातील योक अंड्यात तसाच राहील. मग वाटी बाजूला ठेवा अंड्यातील पांढरा भाग आपण दुसऱ्या कश्यासाठी वापरू शकता.
आता एक स्टीलचे भांडे घेऊन त्यामध्ये अंड्यातील योक काढून घ्या. मग काटे चमचानी फेटून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफलोर, मोहरीची पावडर, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळुवार पणे दूध घालून मिक्स करा. गुठळी होता कामा नये.
मग भांडे लो फ्लेम वर ठेवून मिश्रण हलवत रहा. कॉर्न कॉर्न फलोर लगेच हळू हळू घट्ट होत जाईल. सारखे चमचानी हलवत राहिले तर गुठळी होत नाही. मिश्रण थोडे घट्ट झाले की विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये व्हेनिगर घालून परत एकसारखे करून घ्या. मग स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमद्धे ठेवा. पाहिजे तेव्हा काढून वापरू शकता.