मिंट लच्छा पराठा टेस्टि स्वादिष्ट पुदीना लच्छा पराठा
पुदिना पराठा हा मस्त टेस्टी लागतो. पुदिना ही खूप औषधी वनस्पति आहे. त्याच्या सेवनाचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. पुदिनाच्या सेवनाने केसांचे आरोग्य चांगले राहते. कान, डोकेदुखी,तोंडात फोड येणे, दात दुखीवर लाभदायक , तसेच पुदिनाच्या सेवनाने अपचनाचे रोग बरे होतात.
The Mint Lachha Paratha Tasty Spicy Pudina Paratha Recipe can be seen on our You tube Chanel Mint Lachha Paratha
पुदिनाचा पराठा बनवायला अगदी सोपा आहे. तसेच पुदिना वापरुन त्याचा लच्छा पराठा चविष्ट लागतो. लच्छा पराठा म्हणजे लेयर पराठा त्याच्या मध्ये छान पापुदरे येतात. आपण अश्या प्रकारचा पराठा नुसता टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20-25 मिनिट
वाढणी: 8 पराठे बनतात
साहित्य:
2 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून बेसन
1 कप पुदिना पाने (धुवून चिरून)
1” आले (किसून)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चाट मसाला
1 धने-जिरे पावडर
2 टे स्पून तेल
मीठ चवीने
कृती : प्रथम पुदिना पाने धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या, आले किसून घ्या.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, आले, हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, पुदिना, मीठ व टे स्पून तेल घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. परत वरतून 1 टे स्पून तेल घालून मळून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आता मळलेल्या पिठाचे एक सारखे 8 गोळे बनवा. एक गोला गव्हाच्या पिठात घोळून लाटून घ्या. मग त्यावर 1 चमचा तेल पसरवून घ्या. वरतून गव्हाचे पीठ भुरभुरा आता आपल्याला त्याचा लच्छा पराठा लटायचा आहे त्यासाठी आपल्याला लाटलेल्या पराठ्याला फोल्ड करायचे आहे त्यासाठी (आपण लहान मुलांसाठी पेपरचा फॅन कसा बनवतो तसे फोल्ड करायचे आहे. म्हणजे पोळीच्या टोकाला छोटे मुदपायचे मग परत उलट मुडपायचे अश्या प्रकारे सर्व पोळी मुदपुन त्याची वेटोळी घालायची मग वरतून पीठ लावून थोडे जाडसर लाटायचे.
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर पराठा तेल लाऊन चांगला भाजून घ्यायचा. सर्व पराठे अश्या प्रकारे लाटून भाजून घ्यायचे.
मग गरम गरम पराठे तूप किंवा बटर लाऊन टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.