परफेक्ट चविष्ट एग मायो अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच
आपण सँडविच बनवतो तेव्हा आपण चटणी लाऊन कांदा टोमॅटो व काकडी घालतो. पण आपण अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच बनवले आहे का खूप चविष्ट लागते. बनवून बघाच.
आपण ह्या अगोदरच्या आर्टिकल किंवा विडियो मध्ये अंड्याचे मेयोनिज सॉस कसा बनवायचा ते पहिले आता आपण त्याच मेयोनिज सॉसनी ब्रेड सँडविच कसे बनवायचे ते आपण पाहूया.
The Perfect (Egg Mayo) Egg Mayonnaise Sandwich For Breakfast Recipe can be seen on our You tube Chanel Egg Mayo| Egg Mayonnaise Sandwich
अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. मुले अगदी आवडीने खतील. तसेच आपण अश्या प्रकारचे अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच ब्रेकफास्ट साठी किंवा रात्री जेवणात सूप बरोबर सुद्धा बनवू शकतो.
अंड्याचे मेयोनिज ब्रेड सँडविच बनवताना अंडी उकडून, कांदा, टोमॅटो, व सॉस वापरला आहे व बटरमध्ये छान क्रिसपि असे भाजून घेतले आहेत त्यामुळे ते खूपच चविष्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 8 सँडविच बनतात
साहित्य:
8 ब्रेड स्लाइस
2 अंडी उकडून
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1 छोटा टोमॅटो (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
½ कप मेयोनिज
मीठ चवीने
½ टी स्पून मिरे पावडर
बटर सँडविच फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम अंडी उकडून, सोलून बारीक चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. टोमॅटो व कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या. ब्रेडच्या जाड कडा थोड्याश्या कापून घ्या. (कडा टाकून ण देता त्या मिक्सरमध्ये बारीक करून आपण पाहिजे तेव्हा कटलेट बनवताना वापरू शकता.)
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये बारीक चिरलेली अंडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मेयोनिज सॉस, मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या. व बनवलेले मिश्रण बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. एका प्लेटमध्ये ब्रेड स्लाइस घेऊन त्याच्या वर 1 टे स्पून मिश्रण पसरवून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून मधोमध कापून त्याचे दोन भाग करा.
नॉनस्टिक पॅन वर थोडे बटर घालून त्यावर बनवलेले सँडविच ठेवा बाजूनी परत थोडे बटर सोडा मंद विस्तवावर छान सँडविच भाजून घ्या मग उलट करून परत बाजूनी थोडेसे बटर घालून भाजून घ्या. दोन्ही बाजूनी छान गुलाबी रंगावर भाजून झाल्यावर मग गरम गरम सर्व्ह करा.