रताळी | शकरकंद | स्वीट पोटेटो खाण्याचे फायदे व तोटे
रताळी | शकरकंद | स्वीट पोटेटो सकाळी सेवन केले तर त्याचे योग्य आरोग्यदाई फायदे होतात.
रताळी | शकरकंद | स्वीट पोटेटो साधारपणे लोक उकडून किंवा भाजून सेवन करणे खर म्हणजे रताळी सेवनाची योग्य वेळ असते. तरच त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात. रताळी मध्ये आयरन, प्रोटीन, फाइबर, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, कैल्शियम, फास्फोरस, पोटेशियम, थायमिन व जिंक आहे. जे आपल्या शरीरासाठी दिवसभर जेव्हडे जरूर आहे तेव्हडे बरोबर मिळते. पान आपल्याला माहीत आहे का रताळी सेवणाचे जेव्हडे फायदे आहेत तेव्हडे तोटे सुद्धा आहेत. रात्रीच्या वेळी जर आपण रताळे सेवन केलेतर आपल्या शरीराचे वजन वेगाने वाढते व पोट सुद्धा बिघडू शकते.
The Ratalu | Shakarkandi | Sweet Potato Health Benefits can be seen on our YouTube Ratalu | Shakarkandi | Sweet Potato Health Benefits
ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ताच्या वेळी रताळी सेवन करणे फायदेमंद आहे.
एक रताळे आपण सकाळी खाल्ले तर दिवसभर आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी मदत मिळते. त्यामध्ये भरपूर विटामीन व एंटीऑक्सीडेंट आहेत जे आपल्या शरीराला फायदेमंद आहेत. म्हणूनच सकाळी एक रताळे सेवन केल्यास आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी, हार्टसाठी व किडनिच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
रताळी सेवनाचे फायदे:
1. रताळी डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहेत. त्याच्या सेवनाने आपल्या डोळ्याची दृष्टी चांगली होते. जर आपल्याला डोळ्याची दृष्टी कायम चांगली हवी असेलतर आपल्या आहारात रताळे शामील करून घ्या.
2. रताळे सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कारण की त्याच्या मध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
3. रताळ्यामध्ये पोट्याशीयम आहे. त्यांच्या मुळे ब्लड प्रेशर च्या समस्या कमी होतात. आपण आपल्या आहारात नक्की शामील करून घतले पाहिजे. कारण हाय ब्लड प्रेशर च्या समस्या पासून वाचले जाऊ शकते.
4. रताळ्याच्या सेवनाने पाचन तंत्र चांगले राहते. कारण त्यांच्या मध्ये फायबर आहे. त्यामुळे कब्ज सारख्या बीमारी पासून आराम मिळतो.
5- आपल्या शरीरात आयर्न कमी असेलतर रताळे सेवन करावे. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.
6- रताळ्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ति मजबूत बनते. त्याच्या मध्ये आयर्न जास्त प्रमाणात असल्यामुळे ब्लड सेल्स निर्माण होण्यास मदत होते.
रात्री रताळे सेवन करण्याचे तोटे किंवा नुकसान:
खर म्हणजे रताळे मध्ये हाय कॅलरी आहेत तसेच त्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शरीरात असणारे पोषक तत्व व त्याना पचवण्यास व हाय कॅलरी बर्न करण्यास फार वेळ लागतो.
जर आपल्या शरीरातील लवकर बर्न नाही झाल्या तर शरीराचे वजन वेगाने वाढते. व डायजेशनच्या समस्या वाढू शकतात.