शनिवारी हे अद्भुत उपाय केल्यास नोकरी-व्यापार संबंधित सर्व परेशानी दूर होईल
शनिवारचा दिवस हा कर्मफल दाता भगवान शनि ह्यांना समर्पित आहे. ह्या दिवशी नोकरी किंवा व्यापार संबंधित अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय केले तर ते अत्यंत लाभदायक आहेत.
न्याय देवता शनि ह्यांचा प्रकोप झाल्यास जीवनात नोकरी किंवा व्यापारमध्ये परेशानी येतात म्हणून शनिवार ह्या दिवशी शनि देवाचे उपाय करणे व पूजा अर्चा करणे लाभदायक होतात. शनिवार हा दिवस शनिदेवाचा असल्यामुळे त्यांना प्रसन्न केले पाहिजे.
The Shaniwar Che Adbhut Upay Nokri-Vyapar Sathi can be seen on our YouTube Shani Che Shaniwar che Upay
शनिवार ह्या दिवशी खाली दिलेले अद्भुत उपाय करून नोकरी व्यापार संबंधित सर्व परेशानी दूर होतील. शनि हा नव ग्रह मधील एक ग्रह पीडा देणारा असे मानले जाते. जर कोणत्या सुद्धा व्यक्तिवर शनि देवाची कृपा झाली तर त्या व्यक्तीचे जीवन बदलून जाते व त्याला सुख समृद्धी मिळते. जर शनिदेवाचा कोणत्या व्यक्तिवर कोप झाला तर तो व्यक्ति राजा से रंक बनायला वेळ लागत नाही.
शनिदेव आपल्याला आपल्या कर्मा नुसार आपल्याला न्याय देत असतात. आपण जीवनात चांगले कर्म केले तर त्याचे आपल्याला चांगले फळ प्राप्त होते जर बुरे कर्म केलेतर आपल्याला शनिदेव दंड देतात. धार्मिक मान्यता अनुसार शनिदेव ह्यांना लवकर क्रोध येतो. म्हणूनच शनिवार ह्या दिवशी शनीदेवांची विधी पूर्वक पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घ्या.
जर आपल्या कुंडलीमध्ये शनह्या ग्रहाच्या मुळे सुख शांतीचा अभाव आहे. तर शनिवार ह्या दिवशी पुढील दिलेले उपाय करून शनिदेवाची कृपा हासिल करून त्याना प्रसन्न करून घ्या.
शनिवार ह्या दिवशी कोणते उपाय करावे:
1. शनिवार ह्या दिवशी ह्या वस्तूचे दान करावे:
जर आपल्या प्रगती होण्यामध्ये अडचणी येत आहते तर शनिवार ह्या दिवशी शनिशी जोडलेल्या वस्तु दान कराव्या. ह्या दिवशी उदीडदाळ, तेल, लोखंड, रत्न, काळे कपडे इ. वस्तूंचे दान करावे.
2. शनिवार ह्या दिवशी हे रत्न धारण करावे:
नोकरी व व्यवसाय संबंधित परेशानी दूर करण्यासाठी ह्या दिवशी निलम हे रत्न परिधान करावे. असे म्हणतात की हे रत्न शनीच्या दुष्प्रभाव पासून भक्ताला दूर ठेवते.
3. समृद्धि साठी शनि यंत्र ची पूजा करावी:
घरात सुख शांती अथवा समृद्धीसाठी शनिवार ह्या दिवशी शनि यंत्राची पूजा करा. शनि यंत्राची पूजा करण्यासाठी होरा व शनि नक्षत्र मध्ये धारण करणे शुभ मानले जाते.
4. जडी बुटीना धारण करा:
शनिदेवांची कृपा मिळण्यासाठी बिच्छू ह्या झाडाचे मूळ किंवा धतुरा ह्या झाडाचे मूळ धारण करावे. शनि होरा व शनि नक्षत्र ह्या मध्ये धारण करावे.
5. शनिचा मंत्र जाप करावा:
शनिवार ह्या दिवशी ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः हा मंत्र जाप करावा. ह्या काळात 1008 वेळा मंत्र जाप करावा. त्यामुळे शानिदेवची कृपा राहित किंवा ॐ शं शनिश्चरायै नमः हा मंत्र जाप करावा.
6. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी सुंदरकांड किंवा बजरंगबाण ह्याचे वाचन करावे.
7. शनिवारी ह्या दिवशी शमी च्या झाडाला जल अर्पित करावे.
8. शनिवार ह्या दिवशी दारू, नॉनव्हेज, सट्टा, परस्त्री हे सर्व वर्ज आहे. गरीब, महिला, वृद्ध लोक याना मदत करा. आई वडिलांना कष्ट देऊ नका. मुक्या प्राण्याना त्रास देवू नका.