टेस्टि कुरकुरीत होममेड पोटैटो स्माइली लहान मुलांसाठी
स्माईली हे आपल्या परिचयाचे आहे. लहान मुलांचे अगदी आवडते. मुलांना भूक लागली तर आपण असे फ्रीजर मध्ये बनवून स्टोर करू शकतो. व पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करू शकतो.
स्माईली आपण बटाटा वापरुन बनवू शकतो तसेच ती बनवायला अगदी सोपी आहे. स्माईलीचे आपण डोळे व तोंड वेगवगळे बनवू शकतो. आपण मोबाइल मध्ये बघत असालच. त्याचे आकार व त्याचा कुरकुरीत पणा पाहूनच मुले आनदी होतात.
The Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids Recipe can be seen on our You tube Chanel Tasty Crispy Homemade Potato Smiley For Kids
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 17-18 बनतात.
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
2 टे स्पून तांदळाचे पीठ किंवा कॉर्न फलोर
½ कप ब्रेड क्रंब्स
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. एका बाउलमध्ये किसलेले बटाटे, तांदळाचे पीठ, ब्रेड क्रंब्स, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून एक गोळा बनवून त्यावर एक चमचा तेल घालून मळून झाकून फ्रीजमद्धे 30 मिनिट ठेवा.
मग पीठ फ्रीजमधून बाहेर काढून त्याचे दोन समान भाग करून त्याची थोडी जाड चपाती लाटून घ्या. मग एका छोट्या आकाराच्या वाटीने गोल गोल चकत्या कट करून घ्या. मग बाकीचे बाजूचे पीठ काढून ठेवा. आता एक कट केलेली चकती घेऊन त्यावर स्ट्रॉने दोन डोळे करून घ्या. व तोंडाचा आकार देण्यासाठी एक छोटा चमचा घ्या. अश्या प्रकारे स्माईली बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मध्यम विस्तवावर स्माईली तळून घ्या. तळलेल्या स्माईली टिशू पेपरवर ठेवा. अश्या प्रकारे सर्व स्माईली तळून घ्या.
गरम गरम स्माईली टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. मुले खुश.
टीप: जर आपल्याला फ्रीजमद्धे स्टोर करून ठेवायची असतील तर स्माईली बनवून एका स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून डीप फ्रीजमद्धे 2 तास ठेवा मग काढून जीप लॉक च्या पिशवीत ठेवून फ्रीजमद्धे स्टोर करू शकता. मग पाहिजे तेव्हा बाहेर काढून तळून सर्व्ह करा.